Viral Story 
देश

Viral Photo: इतका राग कशाचा! भाजी मार्केटमधील महिलेचा फोटो होतोय व्हायरल; काय आहे स्टोरी?

Angary woman Viral Story: सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो भाजीमार्केटमध्ये लावण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सोशल मीडियावर कधी-काय पाहायला मिळेल याचा नियम नसतो. काही पोस्ट हसवणाऱ्या असतात, तर काही चिड आणणाऱ्या किंवा किळसवाण्या असतात. काही पोस्टमुळे पोटभरुन हसायला येतं. अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल आणि कुतूहल देखील वाटेल.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो भाजी मार्केटमध्ये लावण्यात आला आहे. महिला एकदम रागाने पाहात आहे. लोक हा फोटो पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. शिवाय महिलेचा इतका राग पाहून लोकांना हसू देखील अनावर होत आहे. भाजी मार्केटमध्ये असे फोटो का लावले आहेत असा प्रश्न लोकांना प़डला आहे.

रागावलेल्या महिलेचा फोटो झाडाला लटकवलेला दिसत आहे. अशा प्रकारचा फोटो तुम्हीही पहिल्यांदाच पाहिला असेल, महिलेच्या फोटोसमोर मोठ्या प्रमाणात टोमॅटो दिसत आहेत. तसेच काही फळं देखील दिसत आहेत. दाव्यानुसार, हा फोटो बेंगळुरुतील एका भाजी मार्केटमधील आहे. हा फोटो का लावण्यात आलाय याचं कारण समजू शकलेलं नाही. तसेच महिला कोण आहे हे देखील कळू शकलेलं नाही. पण, सध्या याच फोटोची चर्चा सुरु आहे.

फोटो फोटोशॉप करुन तयार केलाय की खरा आहे हे अस्पष्ट आहे. पण, फोटो मजेशीर आहे हे नक्की. हा फोटो सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर @Niharika__rao या युझरने शेअर केला आहे. फोटोला कॅप्शन देण्यात आलंय की, 'मी आज खूप खूष आहे की बाहेर फिरायला गेले.' पोस्टला चांगली पसंती मिळत आहे. हजारो लोकांनी याला लाईक केले आहे.

लोकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी म्हटलं की, 'यामागे कोणतीही स्टोरी नाही. लोकांच्या वाईट नजरांपासून वाचण्यासाठी हा फोटो आहे. हा फोटो ट्रेंड बनला असून दुसऱ्या दुकानांवर देखील हा फोटो लावण्यात आला आहे.' एकाने म्हटलं की, 'हा फोटो पाहून मला रात्री वाईट स्वप्न पडत आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या पन्नाशीत गुन्हा, ३४ वर्षांनी ८४व्या वर्षी दोषी, आज शिक्षेची सुनावणी; आरोपीचा VIDEO VIRAL

माधुरी दीक्षित त्या कृतीमुळे झाली ट्रोल, उत्तर देताना म्हणाली...'कोणाचाही वाईट हेतू नव्हता पण...'

Latest Marathi News Live Update : काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

IND vs AFG, T20I: अफगाणिस्तान पहिल्यांदाच भारताचे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी यजमानपद भूषवणार! कुठे होणार सामने?

Stock Market Today: इराणच्या निर्णयाचा शेअर बाजाराला फटका! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, गुंतवणूकदारांनी काय करावे?

SCROLL FOR NEXT