Barking Dog Google
देश

रात्रीच्या वेळी कुत्रे गाडीच्या मागे का धावतात? जाणून घ्या कारण

कुत्री मागे लागल्याने अनेक वाहन चालक घाबरून गाडी अधिक जोरात चालवतात.

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही जर रात्री उशिरा दुचाकीने (Bike) प्रवास करत असाल आणि कोणत्याही रस्त्यावरून, शेजारून किंवा कुत्र्यांचा ( Barking Dog) वावर असलेल्या ठिकाणामधून जात असाल, तर तुमची मोटरसायकल पाहून कुत्रे भुंकण्यास सुरूवात करतात. तर कधी कधी हे कुत्रे इतके उग्र होतात की, ते गाडीच्या मागे चावायला धावतात. यामुळे अनेक वाहन चालक घाबरून घसरुन पडतात. (Why Street Dog Run Behind Vehicles in Night)

रात्रीच धावतात कुत्रे

गाडीच्या मागे कुत्रे (Dog) धावल्याचा अनुभव प्रत्येकालाच आलेला असतो. मात्र, असे का घडते याचा तुम्ही विचार केला आहे का? तर, या मागचे कारण म्हणजे, जेव्हा तुमच्या बाईकचा वेग जास्त असतो तेव्हाच असे घडते. (Bike Speed)

कुत्र्यांना नाही आवडत ही गोष्ट

सामान्यतः वाहनचालक कुत्र्यांना गाडी मागे धावताना पाहून दुचाकी अधिक वेगाने चालवतात, ज्यामुळे कुत्र्यांना दुखापत (Injury) होण्याची शक्यता अधिक वाढते, आणि वाहनचालकांची हीच सवय कुत्र्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या गाडीच्या मागे कुत्री धावतात. गाडीचा वेग पाहून कुत्र्यांना बाइकपेक्षा वेगाने धावण्याची इच्छा जागृत होते. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या गाडीमागे ते भुंकत धावत सुटतात. (Dogs Don't Like These Habit)

तुम्हालाही कुत्र्यांची भीती (Dog Fear) वाटत असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. असो, मोटारसायकल अतिवेगाने चालवू नये. ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जर कुत्रे तुमच्या बाईकच्या मागे वेगाने धावत असतील आणि कुत्र्यांना पाहून तुम्ही तुमच्या बाईकचा वेग वाढवत असाल, तर येथून पुढे काळजी घ्या. हे तुमच्यासाठी फायद्याचे आहे. अन्यथा अपघात होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Schools Closed India : देशात ५ वर्षांत १७ हजार सरकारी शाळा बंद, अहवालातून धक्कादायक माहिती उघड; शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

'श्री' पुन्हा परतला! शंशाक केतकरचं झी मराठीवर कमबॅक, 'या' मालिकेत एन्ट्री घेणार

Pimpri Chinchwad Metro: निगडी-चाकण मेट्रो मार्ग ‘डीपीआर’च्या टप्प्यात; सुमारे १३ हजार कोटींचा आराखडा, शहरात ‘रिंग मेट्रो नेटवर्क’चीही चर्चा

Latest Live Updates Marathi : विरार-भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

PoK Election Violence : पीओके विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार; गोळीबाराचा थरारक व्हिडिओसमोर, ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT