crime news 
देश

Crime News: कामावरुन आलेल्या पतीला जेवण देण्यास पत्नीने केला उशीर अन् गेले दोन जीव; वाचा धक्कादायक घटना

shocking incident : उत्तर प्रदेशातून दररोज काही विचित्र आणि धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना यूपीच्या सीतापूरमधून समोर आली आहे

कार्तिक पुजारी

लखनऊ- उत्तर प्रदेशातून दररोज काही विचित्र आणि धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना यूपीच्या सीतापूरमधून समोर आली आहे. जेवण मिळायला उशीर झाल्याने पतीने आधी आपल्या पत्नीची हत्या केलीये, त्यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली आहे. पतीने गळफास घेऊन जीवल संपवलं आहे.(Wife delayed to give food to her husband who came from work two lives were lost)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थानगांव पोलीस स्टेशन क्षेत्रातील कोटवालनपुरवा गावात ही घटना घडली आहे. ३० वर्षीय व्यक्ती कामावरुन घरी आला होता. त्याने पत्नीकडे जेवण मागितलं. पत्नीकडून जेवण देण्यास थोडा उशीर झाला. यावरुन दोघामध्ये भांडण सुरु झाले. वाद इतका टोकाला गेला की पतीने धारधार शस्त्राने पत्नीची हत्या केली आहे. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

थानंगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी हनुमंत लाल तिवारी यांनी यासंदर्भातील अधिक माहिती दिली. ते म्हणाले की पतीचे नाव परसराम आहे तर पत्नीचे नाव प्रेमा देवी (वय २८) आहे. रागाच्या भरात पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर तुरुंगात जाण्याच्या भीतीने स्वत:ला देखील संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

परसराम हा शेतकरी होता. तो शेतात काम करुन घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने पत्नीकडे जेवण मागितले. दुपारचे जेवण प्रेमा देवीने तयार केले नव्हते. त्यामुळे जेवण बनवून ते परसरामला वाढण्यास उशीर झाला. भुकेजलेल्या पतीला याचा प्रचंड राग आला होता. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरु झाले. यावेळी परसरामने घरातील एक धारदार शस्त्र बाहेर काढले आणि पत्नीवर सपासप वार केले. यात प्रेमा देवीचा मृत्यू झालाय.

गावकऱ्यांनी सांगितलं की, सदर घटनेनंतर लोक परसरामच्या घराभोवती जमा झाले होते. परसराम याने स्वत:ला एका खोलीमध्ये बंद करुन घेतले होते. त्यानंतर पोलिसांच्या भीतीने त्याने खोलीमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अधिक तपास केला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT