gang rape  esakal
देश

पत्नीने केला पतीच्या प्रेयसीवर ५ गुंडांच्या मदतीने सामूहिक बलात्कार

हैदराबादमधील एका विवाहित महिलेने आपल्या पतीच्या प्रेयसीवर पाच गुंडांच्या साहाय्याने बलात्कार घडवून आणल्याची घटना घडली आहे.

दत्ता लवांडे

हैद्राबाद : हैदराबादमधील एका विवाहित महिलेने आपल्या पतीच्या प्रेयसीवर पाच गुंडांच्या साहाय्याने बलात्कार घडवून आणल्याची घटना घडली आहे. आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध हळूहळू उघडे पडू लागल्यावर पत्नीने पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी पाच गुंडांच्या साहाय्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार घडवून आणला आहे. ती आणि तिचा पती दोघेही सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी तयारी करत आहेत.

(Crime News Update)

हैदराबादमधील गाचीबोवली पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसहित सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर सामूहिक बलात्काराचे आरोप लावले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यासंदर्भातील माहिती देताना पोलिसांनी, आरोपी महिलेचा पती आणि पीडित महिला ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पासून या घरात राहत होते. जेव्हा ही गोष्ट त्याच्या बायकोला समजली त्यानंतर पीडितेने घर खाली केलं होतं असं पोलिसांनी सांगितलं.

त्यानंतर आरोपी पत्नीने पीडित महिलेला या घटनेचा जाब विचारण्यासाठी आपल्या घरी बोलावून घेतले होते. पीडिता आपल्या पालकांसोबत तिच्या घरी पोहोचली तेव्हा पत्नी म्हणाली की "मला तुझ्याशी खासगीत बोलायचं आहे, तर फक्त तू घरात ये." पण त्याअगोदर आरोपीने पाच गुंडांना आपल्या घरी बोलावून घेतले होते. पीडिता घरात गेल्यावर तिने त्या पाच गुंडांच्या साहाय्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

तिने खूप प्रयत्न केला होता पण तिच्या तोंडात बोळा कोंबून ठेवल्यामुळे तिला ओरडता आलं नव्हतं, पण अथक प्रयत्नानंतर तिने वाचवण्यासाठी आवाज दिला आणि बाहेर उभे असलेल्या पालकांनी दार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गुंड पळून गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पलायन केलेल्या सर्व आरोपींचा शोध घेण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्यांना सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT