देश

Marriage : बायकोला लागली सरकारी नोकरी आणि नवऱ्याला म्हणते, "तू कोण ?"

दोघांच्याही लग्नावेळी मुलाचे आणि मुलीचे कुटुंबीय उपस्थित होते.

सकाळ डिजिटल टीम

Wife Refused To Recognize Husband : सरकारी नोकरी लागताच पत्नीने पतीला ओळखण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पीडित तरूणाने पत्नीवर फसणुकीचा आरोप केला आहे. जिच्या नोकरीसाठी आपण 15 लाख रुपये खर्च केले तिनेच आता ओळखण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर न्यायासाठी दारोदारी भटकंती करत आहे.

अशी झाली होती ओळख

पीडित तरूणाने सांगितले की, आमच्या दोघांची भेट विमानतळ मैदानावर झाली होती. येथे आम्ही प्रॅक्टिससाठी येत होतो. त्यावेळी आपली पत्नी बिहार पोलीस दलाच्या भरतीसाठी तयारी करत होती तर, मी भारतीय लष्कराची तयारी करत होतो. यादरम्यान आमचे एकमेकांवर प्रेम जडले त्यानंतर आम्ही लग्न केले.

लग्नानंतर काही दिवसांनी पत्नीला बिहार पोलिसात नोकरी लागली. नोकरी मिळताच तिने मला पती म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. माझ्या पत्नीचे बदललेले रूप बघितल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एवढेच नव्हे तर, पत्नीने माझा नंबरही ब्लॉक केला आहे.

न्यायासाठी भटकंती

सरकारी नोकरी लागल्यानंतर पती म्हणून ओळखण्यास नकार दिल्यानंतर संबंधित पीडित तरूण न्यायासाठी दारोदारी भटकत असून, अद्यापपर्यंत त्याला न्याय मिळालेला नाही. या दोघांच्याही लग्नावेळी मुलाचे आणि मुलीचे कुटुंबीय उपस्थित होते. मात्र, आता आमचा या लग्नावर विश्वास नसल्याचे मुलीचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT