Calcutta HC Sakal
देश

Calcutta HC: पतीच्या संमतीशिवाय पत्नी मालमत्ता विकू शकते का? उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Calcutta HC: कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महिलेने उच्च न्यायालयात अपील केले होते.

राहुल शेळके

Calcutta HC: 'पतीच्या परवानगीशिवाय पत्नीने आपली मालमत्ता विकली तर त्याला क्रूरता म्हणता येणार नाही', अशी टिप्पणी कोलकाता उच्च न्यायालयाने केली. उच्च न्यायालयात घटस्फोटाशी संबंधित एका खटल्याची सुनावणी सुरू होती.

कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महिलेने अपील केले होते. न्यायमूर्ती हरीश टंडन आणि न्यायमूर्ती प्रोसेनजीत बिस्वास यांच्या खंडपीठाने सांगितले की, दोघेही सुशिक्षित आहेत आणि जर पत्नीने पतीच्या परवानगीशिवाय तिच्या नावावर असलेली मालमत्ता विकली तर ती कोणत्याही प्रकारे क्रूरता नाही.

हायकोर्टने काय सांगितले

कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, 'असे दिसते की (पती आणि पत्नी) दोघेही सुशिक्षित आणि बुद्धिमान व्यक्ती आहेत. अशा परिस्थितीत पतीची संमती न घेता पत्नीने तिच्या नावावर असलेली संपत्ती विकण्याचा निर्णय घेतला, तर ती क्रूरता नाही.

बार अँड बेंचने दिलेल्या अहवालानुसार, उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आणि म्हटले की आपल्याला लैंगिक असमानतेची मानसिकता बदलावी लागेल. आजचा समाज स्त्रीयांवरील पुरुषांचे वर्चस्व मान्य करत नाही.

उच्च न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, "जर पती पत्नीच्या संमतीशिवाय किंवा मताशिवाय कोणतीही मालमत्ता विकू शकतो, तर पत्नी देखील पतीच्या संमतीशिवाय तिच्या नावावर असलेली मालमत्ता विकू शकते."

कोलकाता हायकोर्टाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आणि संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता ट्रायल कोर्टाचा निर्णय स्वीकारार्ह किंवा तर्कसंगत नाही असे सांगितले.

निकाल देताना हायकोर्टाने म्हटले की, या प्रकरणी ट्रायल कोर्टाने दिलेला आदेश पाळणे बंधनकारक नाही. कोर्टाने घटस्फोटाचा आदेश रद्द केला. ट्रायल कोर्टाने घटस्फोटाच्या खटल्यात क्रूरतेला आधार मानून पतीच्या बाजूने निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT