देश

रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय सेवा होणार बंद! 

पीटीआय

नवी दिल्ली - देशातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मिळणारी मोफत वाय-फाय सेवा आता बंद होणार आहे. रेल्वेने ज्यांच्याबरोबर २०१५ पासून या सुविधेची अंमलबजावणी सुरू केली होती त्या ‘गुगल’ने हा निर्णय जाहीर करताना, ४०० स्थानकांवर कंपनी टप्प्याटप्प्याने आपली वाय-फाय सेवा बंद करेल, असे स्पष्ट केले आहे. 

रेल्वे स्थानाकंवर मोफत वाय-फायची सुविधा देण्याची चमकदार घोषणा ‘रेलवे और रेलटेल’ यांच्या सहकार्याने अमलात आली होती. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना २०१५ पासून ४०० रेल्वे स्थानकांवर ही सेवा सुरू झाली होती. प्रभू यांनीच त्याचे उद्‌घाटन केले होते. मात्र त्यात वाय-फायचा वापर करण्यासाठीचे पासवर्ड निरनिराळे असल्याने गाडीचा थांबा असण्याच्या काही मिनिटांच्या काळात ही सुविधा प्रवासी प्रत्यक्षात फार कमी वापरू शकतात, असेही दिसून आले होते. ‘डिजिटल इंडिया’मध्ये इंटरनेटचा वेग देशाच्या विविध भागांत वेगवेगळा असल्याची वस्तुस्थिती आहे. ग्रामीण, दुर्गम व समुद्रकिनाऱ्यांच्या भागात तर टू-जी इंटरनेट सेवा मिळतानाही अजून मारामार होत असल्याचा अनुभव आहे. तरीही रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय सुविधेला भारतातील लोकसंख्येच्या आकारमानामुळे चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले होते व भारताच्या धर्तीवर इतर देशांतही अशी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणाही या कंपनीने केली होती. 

एका अहवालानुसार भारतातील प्रत्येक इंटरनेट वापरकर्ता दरमहा सरासरी १० जीबी डेटा वापरतो व नजीकच्या काळात हे प्रमाण २० टक्‍क्‍यांच्याही पुढे जाण्याची शक्‍यता आहे. मात्र देशात ही सेवा एका झटक्‍यात बंद केली जाणार नसून ४०० स्थानकांवर टप्प्याटप्प्याने ती बंद केली जाईल, असे गुगलने स्पष्ट केले आहे. 

डाटा स्वस्त झाल्याने सेवा बंद 
‘गुगल’ने सुमारे पाच वर्षांपासून सुरू असलेली ही सेवा भारतात बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना, भारतात इंटरनेट डाटा अतिशय स्वस्त झाल्याने स्थानकांवर मोफत वाय-फायची गरज उरलेली नाही, असे कारण दिले आहे. एका अधिकृत ब्लॉगद्वारे ही घोषणा करताना गुगलने म्हटले आहे, की भारतात इंटरनेट तुलनेत खूपच स्वस्त झाल्याने देशातील प्रत्येक व्यक्ती सुलभतेने इंटरनेटचा वापर करतो. याशिवाय भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने (ट्राय) गेल्या पाच वर्षांत इंटरनेट डेटाच्या योजनांत ९० टक्‍क्‍यांहून जास्त कपात केली आहे. साहजिकच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मोफत वाय-फायची गरज संपल्याचे आमचे निरीक्षण आहे. त्यामुळे ही सेवा गुगल बंद करणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी सवलतीच्या डिझेलवर परिणाम

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT