Priyanka Gandhi  
देश

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi astrologer predicted: 'एका ज्योतिषाने माझा हात पाहिला होता आणि त्याने महत्त्वाची घोषणा केली होती- प्रियांका गांधी

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांनी 'आज तक'या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक रंजक किस्सा सांगितला आहे. त्यांनी सांगितलं की, 'एका ज्योतिषाने माझा हात पाहिला होता आणि त्याने महत्त्वाची घोषणा केली होती. मी एक दिवस पंतप्रधान होईल असं त्याने सांगितलं होतं.'

प्रियांका गांधी म्हणाल्या की, मी १२-१३ वर्षांची असेन. एक ज्योतिषी आमच्या घरी आले होते. ते वडिलांची वाट पाहात होते. ते पॉलिटिकल टाईप ज्योतिषी होते. ते आले तेव्हा मी तिथून जात होते. त्यांनी मला बोलावलं अन् माझा हात पाहिला. ते म्हणाले की मोठी होऊन तू पंतप्रधान होणार. जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांनी मला रागावलं. ते म्हणाले की, 'तू काय करत आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी तुझ्या मनामध्ये कधीही यायला नको.'

'काँग्रेसचा जर तिसऱ्यांदा पराभव झाला तर नेहरु-गांधी परिवाराला हटावं लागेल आणि नवीन चेहरा द्यावा लागेल असं म्हटलं जात आहे', असा प्रश्न पत्रकाराने त्यांना विचारला होता. यावर गांधी म्हणाल्या की, काहींनी नेहरु-गांधी अशी धारणा बनवली आहे. आम्ही असा विचार करत नाही. आम्ही नेहरु-गांधी कुटुंबाचे आहोत, म्हणून आम्ही सत्तेत राहावं अशा पद्धतीने आम्हाला वाढवण्यात आलं नाही. मीपण माझ्या मुलांना असं काही शिकवलं नाही. आम्हाला पंतप्रधान होण्यासाठी किंवा कोणत्या पदावर राहण्यासाठी बळजबरी देखील करण्यात आलेली नाही.

आमच्या कुटुंबाकडेच सत्ता पाहिजे अशी जी धारणा बनवण्यात आली आहे ती खोटी आहे. आम्ही राज्य केलंय, त्यामुळे आम्ही स्वत:ला महाराज्याप्रमाणे समजतो, हे सगळं बकवास आहे. तुम्ही कधी माझ्या घरी या. आम्ही महाराजाप्रमाणे राहतो का? ते पाहा. आम्ही साधारण आयुष्य जगतो. सत्ता मिळवण्याची धारणा आम्ही ठेवलेली नाही किंवा आम्हाला सत्तेला चिटकून राहायचंय असाही विषय नाही. आम्ही असा विचार करत नाही, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

दरम्यान, २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहेत. २० तारखेलाच उत्तर प्रदेशातील रायबरेली, अमेठीमध्ये मतदान होणार आहे. हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेससाठी महत्त्वाचे मानले जातात. रायबरेलीतून राहुल गांधी मैदानात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Camera: 'महावितरण'च्या स्मार्ट मीटरमध्ये खरंच कॅमेरा आहे का? वीज वितरण कंपनीकडून स्पष्टीकरण

Latur Police Raid: वाढवणा पोलिसांची तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड; २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांविरुद्ध गुन्हा

Inter-State Robbery Gang: ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune News : सासरच्या मंडळींकडून जावयांना मारहाण; एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसऱ्याला बॅटने झोडपले!

Dnyaneshwar Wakade case: बीडमध्ये भररस्त्यात थरार! ज्ञानेश्वरवर दगड, विटा ,चाकूने वार! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT