Corona-Virus 
देश

चीनमधून ६०० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणणार

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - जीवघेण्या कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या हुएई प्रांतातील ६०० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यास आजपासून सुरुवात होऊ शकते. यासाठी दोन विशेष विमाने तयार ठेवण्यात आली असून चीनच्या सरकारकडून औपचारिक होकारानंतर या विद्यार्थ्यांना भारतात आणले जाईल. 

हुवेई प्रांतात सुमारे १२०० भारतीय विद्यार्थी आहेत. कोरोना विषाणूच्या उपद्रवानंतर यातील आतापर्यंत ६०० हून अधिक जणांना चीनमधील भारतीय वकिलातीतर्फे मायदेशी येण्यासाठी संपर्क साधण्यात आला. त्यांच्यासाठी दोन विशेष विमानेही तयार ठेवण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी साप्ताहिक वार्तालापादरम्यान सांगितले. 

चीनमधील कोणत्याही भारतीय नागरिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याची आतापर्यंतची माहिती आहे. १५ जानेवारीनंतर चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यानंतरच प्रवेश दिला जाईल. अशा प्रवाशांना किमान १४ दिवस एकांतवासात निरीक्षणाखाली ठेवले जाईल. केंद्रीय मंत्रीमंडळ सचिवांनी आज याबाबत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

सर्किटचा ‘डार्क’ अवतार! अर्शद वारसीच्या ‘महाराज’ भूमिकेने वाढवलं ‘घमासान’चं गूढ, खाकी वर्दीत प्रतीक गांधींचा दमदार अंदाज

SCROLL FOR NEXT