

Sankashti Chaturthi 2026: Rare Vibhuvan Yog After 3 Years Brings Massive Luck Shift
sakal
आज विभुवन संकष्टी चतुर्थी. हिंदू धर्मात इतर संकष्टी चतुर्थींप्रमाणे याही संकष्टीला तितकंच महत्त्व आहे. यंदा हा दुर्मिळ योग तब्बल तीन वर्षांनी आला आहे आणि अधिक मासात आल्यामुळे या संकष्टीचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढलं आहे. श्रीगणेशाच्या कृपेचा हा विशेष दिवस काही राशींसाठी तर नशिबाचे दरवाजे उघडणारा ठरणार असल्याची चर्चा आहे.
इतकंच नाही, तर या दिवशी गणपती आणि भगवान विष्णू या दोघांची कृपा मिळते, असं मानलं जातं. त्यामुळे जीवनातील अडथळे कमी होतात आणि सुख-समृद्धी वाढते.