Farmers Protest File Photo  Esakal
देश

Farmer's Protest: आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट, व्हिसा होणार रद्द! हरयाणा पोलिसांचा इशारा

The passports and visas of protesting farmers will be cancelled! Haryana Police Warning | दिल्लीकडं कूच करणारे आणि सध्या शंभू बॉर्डवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना हरयाणा पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीकडं कूच करणारे आणि सध्या शंभू बॉर्डवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना हरयाणा पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (will cancel passport and visa haryana cops warning to protesting farmers)

ज्या शेतकऱ्यांनी हिंसाचारात सहभाग घेतला त्या शेतकऱ्यांचे फोटो अंबाला पोलिसांनी मीडियाला दिले आहेत. तसेच या शेतकऱ्यांविरोधात कडक पावलं उचलणार असल्याचंही सांगितलं. पोलिसांनी असे काही फोटो शेअर केले आहेत ज्यातील शेतकऱ्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

पिकांना किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी हरयाणाच्या शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो' आंदोलनाची हाक दिली होती. त्यासाठी गेल्या पंधरादिवसांपासून शंभू बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. आत्तापर्यंत या शेतकऱ्यांच्या सरकारच्या प्रतिनिधींसोबत अनेकदा चर्चा झाल्या पण या चर्चांमधून ठोस असा कुठलाही तोडगा निघालेला नाही. (Latest Marathi News)

दरम्यान, या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट्स, खिळ्यांचं आणि ताऱ्याचं कुंपण तसेच अश्रुधुरांच्या नळकांड्या, पाण्याचे कँन्टर यांचा वापर करण्यात आला. त्यामुळं या शेतकऱ्यांन दिल्ली शहरात प्रवेश करण्यापासून रोखलं गेलं तरीही अद्यापही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT