child immunity esakal
देश

कोवॅक्सिन दोन वर्षांच्या मुलांवर काम करणार का?

कार्तिक पुजारी

पुढील दोन ते तीन महिन्यात तज्ज्ञांना कळून जाईल की भारत बायोटेकची कोवॅक्सिन (Covaxin) लस दोन वर्षांच्या मुलांवर प्रभावी आहे की नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्लीचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

नवी दिल्ली- पुढील दोन ते तीन महिन्यात तज्ज्ञांना कळून जाईल की भारत बायोटेकची कोवॅक्सिन (Covaxin) लस दोन वर्षांच्या मुलांवर प्रभावी आहे की नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्लीचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'लहान मुलांवर लस किती प्रभाव आहे याचे परिक्षण सुरु झाले आहे. भारत बायोटेक दोन ते १८ वर्षांच्या मुलांचे लसीकरण करत आहे. हे आधीपासूनच सुरु आहे. अनेक मुलांना याआधीच डोस मिळाला आहे.' (will covaxin work on two year olds aiims chief randeep guleria said)

येत्या दोन ते तीन महिन्यात आपल्याला निश्चित सांगता येईल की, लस दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर प्रभावी आहे का नाही. लस प्रभावी असेल तर त्याला नियामक मंडळाची मंजुरी मिळायला हवी. फायझर कंपनीला याची मंजुरी मिळाली आहे, पण अधिक वयांच्या मुलासाठीच ती देण्यात आली आहे, असं गुलेरिया म्हणाले. एम्स दिल्ली आणि पाटणाने कोविड लशीसाठी मुलांना दाखल करुन घेणे आणि परीक्षण सुरु केले आहे.

गुलेरिया पुढे म्हणाले की, परीक्षणासाठी दाखल करुन घेण्यात आलेल्या मुलांमध्ये आधीपासूनच अँटिबॉडी होत्या. त्यामुळे कोरोना महामारीच्या पुढच्या लाटेमध्ये ते प्रभावित होण्याची शक्यता कमी झाली आहे. सध्या उपलब्ध असलेला डेटा सांगतो की, मुलांच्या तुलनेत वयस्कर आणि आजाराने पीडित लोकांचा मृत्यूदर जास्त आहे. त्यामुळे आपले सर्वाधिक लक्ष या वर्गातील लोकांवरच असायला हवं.

कोरोना लसीच्या परिक्षणासाठी आम्ही लहान मुलांचा डेटा गोळा केला. यात दिसतंय की मुलांमध्ये आधीपासूनच अँटिबॉडी आहेत. मुलांमध्ये संक्रमणाचे कोणतेही पुरावे नव्हते. तरी त्यांच्यात अँटिबॉटी तयार झाली आहे. परीक्षणासाठी आलेल्या ५० ते ६० टक्के लोकांना दाखल करुन घेण्यात आलं नाही. कारण, त्यांच्यात आधीपासूनच अँटिबॉडी होत्या. त्यामुळे तिसरी लाट मुलांना प्रभावित करेल असं म्हणणं चुकीचं ठरेल, असंही गुलेरिया म्हणाले. असे असले तरी गुलेरिया यांनी डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

SCROLL FOR NEXT