Palinisamy 
देश

AIADMK: अद्रमुक भाजपला अडचणीत आणणार! नवी आघाडी स्थापण्याची केली घोषणा

भाजपप्रणित एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा नुकतीच पक्षानं केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) नुकतेच बाहेर पडल्यानंतर आता अद्रमुकनं नवी आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच पुन्हा भाजपसोबत जाणार नाही, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळं दक्षिण भारतातील भाजपचा हा मित्रपक्ष भाजपला अडचणीत आणणार असल्याचं चित्र आहे. अद्रमुकचे नेत्यांनी ही माहिती दिली आहे. (Will form new alliance didnt ask for removal of BJP state chief AIADMK)

असं कधीही करणार नाही

क्रृष्णगिरी इथं पत्रकारांशी बोलताना पक्षाचे वरिष्ठ नेते केपी मुनुसामी म्हणाले, "भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांना हटवण्याची मागणी अद्रमुकनं कधीही केली नव्हती. त्यामुळं अद्रमुकसारख्या बड्या पक्षाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारणं हे मुर्खपणाचं आहे. (Latest Marathi News)

आम्ही अशा प्रकारची चूक कधीही करणार नाही. आम्ही इतके असुसंस्कृत नाही की दुसऱ्या एखाद्या पक्षानं कसं काम करावं हे सांगू अद्रमुक असा पक्ष नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.

एनडीएशी पुन्हा जुळवून घेणार?

नंतर पुन्हा एनडीएशी जुळवून घेणार का? या प्रश्नावर मुनुसामी म्हणाले, "स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी दावा केला की हाच धर्म आहे. आम्ही भाजपशी युती तोडल्यामुळं आता डीएमकेची भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. आम्ही पुन्हा एनडीए जॉईन करणार नाही, पण आम्ही नवी आघाडी करणार आहोत ज्याचे अध्यक्ष के पलानीसामी असतील" (Marathi Tajya Batmya)

अद्रमुकनं भाजपशी युती तोडली

नुकतेच अद्रमुकनं चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत भाजपसोबतची गेल्या चार वर्षांपासूनची युती तोडण्याची घोषणा केली होती. पक्षाच्या या निर्णयानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयाबाहेर फटाके फोडत आनंद व्यक्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT