nirmala sitaraman esakal
देश

कर्जबुडव्यांना सोडणार नाही

सीतारामन यांच्या हस्ते आज विविध आर्थिक योजनांचा प्रारंभ करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘देशातील बॅंकांना गंडा घालून परदेशात पळून जाणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांचा माग काढण्यात येईल आणि आपल्या बॅंकांतून जो पैसा परदेशात गेला आहे तो परत आणण्यात येईल.’’ असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. ही फसवणूक करणारी मंडळी देशात आहेत की देशाबाहेर यामुळे फारसा फरक पडणार नाही. केंद्र पुरस्कृत सर्व योजना आणि पंतप्रधान विकास पॅकेजचा सर्व नागरिकांना लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारसोबत योग्य समन्वय ठेवून काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

सीतारामन यांच्या हस्ते आज विविध आर्थिक योजनांचा प्रारंभ करण्यात आला. जम्मू-काश्मीरला करण्यात येणाऱ्या अर्थपुरवठ्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्व ते उपाय आखले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बॅंकांमधील गैरव्यवहार आता खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्याने कर्ज घेतले असेल आणि ते परत केले जात नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. बॅंकांमधून जो पैसा बाहेर पडला आहे तो मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्या म्हणाल्या. काश्मीरचा दोन दिवसांचा दौरा आटोपल्यानंतर सीतारामन आज जम्मूत दाखल झाल्या होत्या.

केंद्राची ‘४-आर’ रणनीती

सीतारामन म्हणाल्या की, ‘‘ केंद्रात २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर बुडीत कर्ज हा चिंतेचा विषय होता. या कर्जांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘४- आर’ रणनीती आखण्यात येईल. यामध्ये मान्यता, निर्धार, फेरभांडवलीकरण आणि सुधारणांचा समावेश होतो. या धोरणाला यश येते आहे. करदात्यांचा पैसा बुडवून परदेशात पलायन करणाऱ्या मंडळींना शोधून काढण्यात येईल. जगाच्या पाठीवर ते कोठेही असो त्यांना शोधून काढण्यात येईल. कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण तापलं; जैन समाजाच्या फसवणुकीचा आरोप, कारवाईची मागणी

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT