PM Modi in Anant Radhika Wedding Sakal
देश

Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नात PM मोदी हजेरी लावणार? मोठी अपडेट आली समोर

PM Modi in Anant Radhika Wedding: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुक्रवारी (12 जुलै) विवाहबंधनात अडकणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही अंबानी कुटुंबीयांच्या लग्नसोहळ्यात सहभागी होणार आहेत.

राहुल शेळके

Anant Radhika Wedding PM Modi: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुक्रवारी (12 जुलै) विवाहबंधनात अडकणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही अंबानी कुटुंबीयांच्या लग्नसोहळ्यात सहभागी होणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या संभाव्य दौऱ्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ट्रायडंट हॉटेलच्या आजूबाजूच्या इमारतींमध्येही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (13 जुलै) रोजी मुंबईला जात आहेत. 13 जुलै रोजी पीएम मोदी मुंबईत अनेक विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. यादरम्यान बोरिवली-ठाणे लिंक रोड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी करणार आहेत. दोन्ही प्रकल्पांची किंमत 14 हजार कोटींहून अधिक आहे.

अंबानी कुटुंबीयांच्या लग्नाला पीएम मोदीही हजेरी लावणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत प्रशासन अत्यंत सतर्क आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाला हजेरी लावू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठाकरे परिवार अन् एकनाथ शिंदे हजर राहणार

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी केवळ बॉलीवूड स्टार्सनाच नाही तर राजकीय जगतातील बड्या व्यक्तींनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे, या व्यतिरिक्त ठाकरे कुटुंबीय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केले आहे. याशिवाय अंबानी कुटुंबाकडून सर्व राजकीय पक्ष आणि विविध नेत्यांना लग्नाची निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

परदेशी पाहुण्यांमध्ये 'या' मोठ्या नावांचा समावेश

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पाहुण्यांच्या यादीत बॉलिवूड, व्यावसायिक क्षेत्र, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा समावेश आहे.

परदेशी पाहुण्यांमध्ये क्रीडा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि त्यांची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम हे अंबानींच्या परदेशी पाहुण्यांच्या यादीत आहेत. कॅनेडियन रॅपर आणि गायक ड्रेक, अमेरिकन गायिका लाना डेल रे आणि ॲडेल लग्नासाठी मुंबईला पोहोचू शकतात.

'या' बॉलीवूड दिग्गजांना आमंत्रण

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात अमिताभ बच्चनपासून ते किम कार्दशियनच्या मेकअप आर्टिस्टपर्यंत सर्वांचा समावेश आहे. याशिवाय शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या भव्य सोहळ्याला येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबतचे 'ते' वक्तव्य भोवले

माेठी बातमी! 'श्रीगोंदेत खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण'; अडीच कोटीची मागणी करत ३० लाख स्वाकारले, जिल्ह्यात खळबळ

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानने टॉस जिंकला, पण भारताच्या मनासारखा निर्णय घेतला; पाहा प्लेइंग - ११

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT