will there be encounter culprits hathras case big sign bjp leader 
देश

Video: 'योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कधीही गाडी पलटी होते'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मला माहिती आहे की, त्यांच्या राज्यात कधीही गाडी पलटी होते, असे भारतीय जनता पक्षाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. त्यामुळे कैलास विजयवर्गीय यांनी केलेल्या विधानांचा अर्थ असा की यातील दोषींचाही एन्काऊंटर होऊ शकतो.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्काराने संपूर्ण देशात संताप पसरला आहे. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. या घटनेतील पीडित मुलीचा मंगळवारी (ता. 29) मृत्यू झाला आहे. हाथरस प्रकरणातील दोषींबाबत भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी मोठे संकेत दिले आहेत. या घटनेतील सर्व आरोपींना पकडण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, हाथरसमधील घटनेने सर्वांच्या मनात चीड निर्माण केली आहे. बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी कडक पाऊल उचलणे गरजेचे आहे. योगी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत, मला माहिती आहे की, त्यांच्या राज्यात कधीही गाडी पलटी होते. शिवाय, उत्तर प्रदेशातील गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरची आठवण करून दिली.'

दरम्यान, उत्तर प्रदेशात ८ पोलिसांचे हत्याकांड घडवणाऱ्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला कानपूरला घेऊन चालले होते. त्यावेळी पोलिसांच्या मोटारीला अपघात झाला होता. विकास दुबे याच मोटारीमध्ये होता. मोटार उलटताच दुबे पोलिसांकडील बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न करत केला. यातच पोलिसांच्या चकमकीत विकास दुबेचा मृत्यू झाला. त्यामुळे कैलास विजयवर्गीय यांनी केलेल्या विधानांचा अर्थ असा की यातील दोषींचाही एन्काऊंटर होऊ शकतो. योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील दोषींना वाचवले जाणार नाही. घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक पुढील ७ दिवसांत अहवाल सादर करेल. वेगवान न्याय मिळावा यासाठी या खटल्याची सुनावणी फास्ट- ट्रॅक न्यायालयात करणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT