Smriti Irani 
देश

रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मित्राच्या घरी न्याल?: स्मृती इराणी

रॉयटर्स

नवी दिल्लीः प्रार्थना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण पावित्र्य नष्ट करण्याचा नाही. परंतु, मासिक पाळी आल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल? असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उपस्थित करतानाच तुम्ही मित्राच्या घरी रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स नेऊ शकत नाही तर मग देवाच्या मंदिरात तुम्ही जाताना त्या अवस्थेत कशा काय जाल? असा प्रश्नही विचारला आहे.

ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन आणि ऑबझर्व्हर्स रिसर्च फाऊंडेशनतर्फे एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, 'सर्वोच्च न्यायालयाने महिलांना मंदिर प्रवेशाचा अधिकार दिला आहे. मी एक केंद्रीय मंत्री म्हणून त्यावर मत नोंदवू शकत नाही पण माझे व्यक्तीगत मत व्यक्त करते. प्रत्येकाला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे, पण पावित्र्य नष्ट करण्याचा नाही. महिलांना मासिक पाळी येते ही अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे. अशा अवस्थेत तुम्ही मंदिरात जाण्याचा हट्ट आणि प्रार्थना करण्याचा हक्क कसा काय बजावू शकता? हे माझे वैयक्तिक मत आहे.'

मी, एक हिंदू आहे आणि एका पारशी व्यक्तीशी विवाह केला आहे. माझ्या दोन्ही मुलांना मी झोराष्ट्रीयन परंपरा शिकवते आहे. जेव्हा मी माझ्या बाळाला घेऊन अंधेरी येथील अग्यारीमध्ये गेले तेव्हा मी माझ्या बाळाला माझ्या नवऱ्याकडे दिले. कारण तिथे मला इथे उभ्या राहू नका, असे सांगण्यात आले होते. माझा नवरा आमच्या बाळाला अग्यारीमध्ये घेऊन गेला. कारण पारशी धर्मीयांशिवाय तिथे कोणीही येऊ नये, असा नियमच आहे. तो मी पाळला, आजही तो जेव्हा अग्यारीत जातो तेव्हा मी रस्त्यावर किंवा मोटारीमध्ये त्याची वाट पाहते, असेही स्मृती इराणी म्हणाल्या.

दरम्यान, केरळच्या शबरीमाला मंदिरात प्रवेशाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिक नागरिक याला विरोध करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan: दिवाळीपूर्वीच ‘पीएम किसान’चा हप्ता;महाराष्ट्रातील ९१.८९ लाख लाभार्थ्यांना हप्ता

Pune HCMTR Project: ५१९२ कोटींच्या प्रकल्पावर आक्षेप; सार्वजनिक वाहतुकीच्या उद्देशाचे काय?

Pune Bus Fire : पुण्यात स्वारगेटजवळ धावत्या शिवाई बसला भीषण आग, १७ प्रवासी थोडक्यात बचावले

Pune Crime News: पैसे स्वीकारून घटस्फोट नाकारणाऱ्या पत्नीला दणका; न्यायालयाकडून पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर

Maharashtra Live News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT