Aircraft Railway Winter Season esakal
देश

Winter Season : रेल्वे, विमानांचं वेळापत्रक कोलमडलं; दाट धुक्यामुळं अनेक गाड्या रद्द

दाट धुक्यामुळे उत्तर रेल्वेने दिल्लीहून जाणाऱ्या १४ गाड्या रद्द केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आणखी तीन ते चार दिवस दिल्लीच्या वातावरण दाट धुक्याची चादर कायम राहणार आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील पारा सात अंश सेल्सिअसवर आल्याने दाट धुक्याची चादर दिल्लीवर पसरली आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने १४ रेल्वे गाड्या रद्द केल्या असून, अनेक विमानांचे (Aircraft) आगमन आणि उड्डाण उशिराने होत आहे.

दिल्लीत मंगळवारी किमान तापमान सात अंश सेल्सिअस होते. हे तापमान सरासरीपेक्षा एका अंशाने कमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हीच स्थिती आणखी तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे. दिल्लीसह हरियाना, पंजाब, चंडीगड, राजस्थान या राज्यांमध्येसुद्धा तापमानात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

दिल्लीत दाट धुक्यामुळे दृश्यमानता बरीच कमी झाली आहे. सफदरजंग, आनंद विहार व इंडिया गेट या परिसरात दृश्यमानता केवळ २०० मीटर एवढीच आहे. पालम परिसरात दृश्यमानता १०० मीटरवर आलेली आहे.

या गाड्या रद्द

या दाट धुक्यामुळे उत्तर रेल्वेने दिल्लीहून जाणाऱ्या १४ गाड्या रद्द केल्या आहेत. यात महाराष्ट्रातून जाणाऱ्या चेन्नई-दिल्ली जीटी एक्स्प्रेस, दुर्ग-निझामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेस, हैदराबाद - नवी दिल्ली तेलंगण एक्स्प्रेस आणि वास्को ते निजामुद्दीन दरम्यान धावणारी गोवा एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.

प्रवाशांना सूचना

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आणखी तीन ते चार दिवस दिल्लीच्या वातावरण दाट धुक्याची चादर कायम राहणार आहे. यामुळे रेल्वे किंवा विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घरून निघण्यापूर्वी रेल्वे किंवा विमान सुटण्याच्या वेळेची खातरजमा करून घ्यावी. यासाठी प्रवाशांनी उत्तर रेल्वेच्या चौकशी विभागाशी किंवा संबंधित विमान कंपनीच्या चौकशी विभागाशी संपर्क साधावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT