Winter Session of Parliament  Team eSakal
देश

Winter Session: विरोधकांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांची निदर्शनं

BJP MPs Protest: संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील गदारोळ सुरुच आहे.

सुधीर काकडे

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session of Parliament) सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवसापासून सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. कृषी कायद्यांच्या मुद्यावरुन झालेल्या गोंधळात राज्यसभेच्या १२ खासदारांना निलंबीत करण्यात आलं. राज्यसभेच्या सदस्यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली. सभागृहाच्या परिसरातील महत्मा गांधींच्या पुतळ्याजवळ बसून आंदोलन केलं. त्यानंतर आता आज थेट सत्ताधारी पक्षाचे खासदारच आंदोलन करत असल्याचं दिसून आलं आहे.

हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: सर्व खासदारांना वेळ वाया न घालवता संसदेचं कामकाज योग्य पद्धतीनं करावं, विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत असं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर कृषी कायदे रद्द करण्याचं विधेयक कोणतीही चर्चा न करता रद्द करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी विरोध केला आणि गोंधळाला सुरूवात झाली. गोंधळाचं हे सत्र अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी देखील सुरू आहे. त्यातच आज विरोधी पक्षांचा विरोध करण्यासाठी थेट सत्ताधारी खासदारांनीच आंदोलन केल्याचं दिसून आलं. विरोधक बेशिस्त वागत असल्याचा आरोप करत आज सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी जोरदार आंदोलन केलं.

दरम्यान, संसदेच्या अधिवेशनाला २९ नोव्हेंबररोजी सुरूवात झाली. यावेळी पहिल्याच दिवशी शिवसेना, काँग्रेस, सीपीआय, तृणमूल, माकप या पक्षांच्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra E-Bond: कागदी बाँडला रामराम; ई-बाँडची सुरुवात, महायुती सरकारचा मोठा निर्णय, फायदे काय?

Arattai vs WhatsApp: स्वदेशी ॲप ‘Arattai’ कोणत्या बाबतीत आहे ‘WhatsApp’पेक्षा वरचढ!

Vande Bharat Train Accident : दसरा उत्सवावरुन परतणाऱ्या पाच तरुणांना 'वंदे भारत' ची धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू, १ गंभीर जखमी

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Latest Marathi News Live Update: शिरोडा वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले, बचाव कार्य सुरू

SCROLL FOR NEXT