fire fire
देश

हात शेकणं आलं तिघांच्या अंगलट; दोघांचा होरपळून मृत्यू तर एक गंभीर

नोयडाचे किमान तापमान आठवडाभरापूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : थंडी (Winter) चांगलीच वाढू लागली आहे. पारा सतत घसरत असल्याने नागरिक स्वतःला गरम ठेवण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर करतात. काही जण लाकडं पेटवून हात शेकत असतात. मात्र, आगीसमोर हात शेकणे तिघांना चांगलेच भोवले. हात शेकताना कपड्यांना आग लागून दोघांचा मृत्यू झाला (two child killed) तर एक जण गंभीर जखमी (one injured) झाला. ही घटना गुरुवारी रात्री फेज-२ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गेढा गावात घडल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेढा गावात गुरुवारी रात्री काही लोक लाकडं पेटवून हात शेकत बसले होते. दरम्यान, तीन मुलांच्या लोकरीच्या कपड्यांनी अचानक आग पकडली. यानंतर तिन्ही मुलं चांगलेच भाजले गेले. उपस्थित नागरिकांनी तिन्ही मुलांच्या कपड्यांना लागलेली आग विझवीत तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दोन मुलांचा मृत्यू झाला (two child killed), तर एकाला जखमीला (one injured) पुढील उपचारासाठी दिल्लीला पाठविण्यात आले. जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

नोयडाचे किमान तापमान आठवडाभरापूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे. २० डिसेंबर रोजी किमान तापमान तीन अंश सेल्सिअस (Winter) नोंदवले गेले होते. २१ आणि २२ डिसेंबरला ते ४-४ अंश होते. दिवसभरातील सततच्या उन्हामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. २२ डिसेंबरला कमाल तापमान २४ अंश होते. गुरुवारी ते २२ अंश होते. येत्या काही दिवसांत कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गदिमांची पंचवटी पाडून बिल्डरला विकण्यासाठी दबाव, कुटुंबाला धोका; माडगूळकरांच्या नातवाची पोस्ट, केले गंभीर आरोप

Black Panther Konkan : सह्याद्रीच्या रांगांमध्ये दिसला दुर्मिळ 'ब्लॅक पँथर'! कोकणात 25 हून अधिक काळे बिबटे? जैवविविधतेला नवा आयाम

Latest Marathi News Live Update: येवला शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा; नागरिक आक्रमक, शिंदेसेनेचा हंडा मोर्चाचा इशारा

IPL 2026: मुंबई इंडियन्सला प्लेऑफमधून बाहेर पडण्यासोबतच झालं कोटींचं नुकसान; जाणून घ्या कसं

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये कौटुंबिक वादातून हाणामारी; जमीन पैशांवरून पती-पत्नीला बेदम मारहाण, जमिनीच्या पैशांवरून वाद पेटला!

SCROLL FOR NEXT