Coronavirus esakal
देश

चोवीस तासात दुप्पट रुग्ण! 2000 हून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी ही माहिती दिली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गानं डोकं वर काढलं आहे. गेल्या चोवीस तासाच दुप्पट कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाल्यानं चितेत भर पडत आहे. याकाळात २,१८३ नवे रुग्ण आढळून आले असून काल १,१५० रुग्ण आढळून आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. (With 2183 fresh cases daily Covid infections in India nearly double in 24 hours)

चोवीस तासातील नोंदीनुसार सोमवारी भारतात २,१८३ नवे रुग्ण आढळून आले, तर २१४ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूंमध्ये केरळमधील ६२ रुग्णांच्या मृत्यूंचा समावेश आहे. दरम्यान, सध्याचा कोविडचा रिकव्हरी रेट ९८.७६ टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३२ टक्के आहे. तर दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.८३ टक्के इतका आहे. सध्या देशात ११,५४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात देशात २,६१,४४० कोरोनाच्या चाचण्या पार पडल्या.

दरम्यान, भारताचं कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं प्रमाण १८६.५४ कोटी डोसच्यावर गेलं आहे. यांपैकी २.४३ कोटी डोस हे १२ ते १४ वयोगटातील मुलांना देण्यात आले आहेत. या वयोगटातील मुलांसाठी १६ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT