Bridge Collapses in Bihar Latest News 
देश

Bridge Collapses in Bihar : बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला! आठवडाभरातील चौथी घटना

Bridge Collapses in Bihar Latest News : बिहारमधील किशनगंज येथील बहादुरगंज येथील पूल कोसळल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी तुषार सिंगल यांनी गुरुवारी दिली.

सकाळ वृत्तसेवा

किशनगंज, ता. २७ (पीटीआय) ः बिहारमधील किशनगंज येथील बहादुरगंज येथील पूल कोसळल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी तुषार सिंगल यांनी गुरुवारी दिली. माडिया या कनकाई नदीच्या उपनदीवर हा पूल बांधण्यात आला होता. या नदीच्या नेपाळमधील पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाण्याचा जोर वाढल्याने हा पूल कोसळला. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

७० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद असलेला हा पूल २०११ मध्ये बांधण्यात आला होता. बिहारमधील पूल कोसळण्याची आठवडाभरातील चौथी घटना आहे. या आधी अररिया, सिवान आणि महाराजगंज येथील पूलही कोसळले आहेत. या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले होते असा दावा स्थानिकांनी केला आहे. बिहारमध्ये सातत्याने घडणाऱ्या या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर येथील सार्वजनिक विभागाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT