rape case  File photo
देश

महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार, कृत्याचा बनवला व्हिडीओ

बर्थ डे पार्टीमध्ये घडली घटना, गुन्ह्यात मुख्य आरोपीच्या आईचा सहभाग

दीनानाथ परब

भोपाळ: महिलांवर होणारे अत्याचार (crime against women) रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार (rape) केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी बलात्काराच्या कृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण (video shoot) करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे पीडीत महिलेने म्हटले आहे. मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) नीमच जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला ही घटना घडली पण पीडीत महिलेने १३ सप्टेंबरला तक्रार नोंदवली. त्यानंतर चौकशी करुन पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपीची आई सहभागी असल्याचं समोर आलं आहे.

बर्थ डे पार्टीमध्ये मुख्य आरोपी, त्याचा भाऊ आणि अन्य एका व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला आहे. मुख्य आरोपीने महिलेला ब्लॅकमेल केले व अन्य नातेवाईकांनी जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

"आरोपीने फेसबुकवरुन पीडित महिलेबरोबर मैत्री केली. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून व्हॉट्स अॅपवरुन त्यांच्यात चॅटिंग सुरु होते. आरोपीने पीडीत महिलेला लहान भावाच्या बर्थ डे पार्टीच्या निमित्ताने बोलावले, तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला" अशी माहिती महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुख अनुराधा गिरवळ यांनी दिली. मुख्य आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गिरवळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

Jagdeep Dhankhar Health Update: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड रूग्णालयात दाखल!, ‘वॉशरूम’मध्ये पडले होते दोनदा बेशुद्ध

AMIM-BJP Alliance : अकोटमध्ये 'एमआयएम-भाजप भाऊ-भाऊ'; आमदार साजिद खान पठाण यांनी पुराव्यासह केला पर्दाफाश!

Mangalwedha ST Depot : मंगळवेढा एसटी आगाराची जिल्ह्यात 'पहिली' झेप; १० लाखांच्या उत्पन्नासह सोलापूर जिल्ह्यात अव्वल!

Latest Marathi News Live Update : सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT