bihar 
देश

देवीच्या दारात पुजाऱ्याची मुजोरी; महिलेचे केस पकडून मारहाण

कार्तिक पुजारी

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील एका पुजाऱ्याने मंदिरात पूजा करण्यासाठी आलेल्या महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुजाऱ्याने महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

नवी दिल्ली- बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील एका पुजाऱ्याने मंदिरात पूजा करण्यासाठी आलेल्या महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुजाऱ्याने महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओनंतर मंदिर कमेटीने पुजाऱ्याविरोधात कारवाई केली असून प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पुजाऱ्याला मंदिरातील कार्य करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. (National Latest Marathi News)

घटना दरभंगाच्या राज परिसरमधील माँ श्यामा माई मंदिरेच्या पायऱ्यांवर घडली आहे. याठिकाणी पुजाऱ्याने मंदिरात आलेल्या महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. या घटनेचा एकाने व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. मंदिर हा व्हिडिओ कमेटीच्या निदर्शनास आला. मंदिर कमिटीने तत्काळ कारवाई करत मंदिराच्या पुजाऱ्याला मंदिरासंबंधी कामापासून मुक्त केले आहे.

असे असले तरी महिलेकडून अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. महिलेची ओळख पटू शकलेली नाही. माहितीनुसार, घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. महिला मंदिरात जाऊन श्यामा माईच्या पूजेचा हट्ट करत होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

माहितीनुसार, महिला मंदिराचे दरवाजे उघडण्याची मागणी करत होती. या मुद्द्यावरुन पुजारी आणि महिलेमध्ये वाद निर्माण झाला. वादादरम्यान संतापलेल्या पुजाऱ्याने महिलेचे केस पकडत तिला मारहाण सुरु केली. व्हिडिओची पुष्टी करत मंदिर कमिटीचे सदस्य चौधरी हेमचंद्र रॉय यांनी म्हटलं की, 'महिलेसोबतचे हे वर्तन योग्य नाही. पुजाऱ्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. '

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : राज्यात होणार डॉक्टरांची मेगाभरती, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Pimpri-Chinchwad Youth Rally: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’च्या घोषणांनी १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

SCROLL FOR NEXT