viral video Esakal
देश

Viral Video: 'मी बेशरम आहे'; मेट्रोत बसायला जागा न मिळाल्याने तरुणाच्या चक्क मांडीवर जाऊन बसली महिला

Delhi Metro viral video: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी महिलेवर संताप व्यक्त करत आहेत.

कार्तिक पुजारी

Viral Video: दिल्ली मेट्रो वादाचं, गोंधळाचं केंद्र ठरत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, दिल्ली मेट्रोसंदर्भात दररोज काहीही विचित्र ऐकायला मिळतं. कधी जागा मिळण्यासाठी भांडण होतं, कंटेन्ट क्रिएटर्स रिल्स बनवतात तर कधी एखाद्याच्या आक्षेपार्ह कृतीसाठी दिल्ली मेट्रो चर्चेत येते. सध्या दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Woman Forcibly Sits on Man Lap Inside Delhi Metro viral video)

व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक महिला मेट्रोमध्ये जागा मिळत नसल्याने चक्क एका व्यक्तीच्या मांडीवर जाऊन बसते. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलं नाही पण सध्या हा व्हिडिओ चर्चेत आहे. मेट्रोमध्ये गर्दी होती, यावेळी काळा मास्क घातलेली महिला जागेसाठी प्रवाशांशी भांडते. जेव्हा तिला कोणीही जागा देत नाही तेव्हा ती एका तरुणाला जागा देण्यास सांगते. त्याने नकार दिल्याने महिला चक्क त्याच्या मांडीवरच जाऊन बसते.

महिला तरुणाच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर म्हणते, 'मला काय, आम्हीपण बेशरम होऊ' यादरम्यान बाजूच्या जागेवर बसलेला व्यक्तीला नाईलाजाने त्याच्या जागेवरुन उठावे लागते. महिला म्हणते की, 'मला फरक पडत नाही. तुम्हाला फरक पडत असेल. तेही आता नाही रात्री फरक पडत असेल.' महिला असंही म्हणते की, ती नेहमी नियमांचे पालन करते. 'मी नियम का मोडू?'

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी महिलेवर संताप व्यक्त करत आहेत. महिलेची वागणूक योग्य नसून तिला अटक करण्याची यावी अशी मागणी होत आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं की, ;म्हणून आपल्याला लिंग-समानता हवी आहे. पोलिसांनी देखील असाच दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.' एका नेटकऱ्याने म्हटलं की, 'अनेक पुरुष महिलांना बसायला जागा देतात. पण, यांचं आता अती होत आहे.' (Viral Video)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Management: पाण्याचे नियोजन ठरलेय; आता बदल होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील ,रखडलेल्या पाणी योजनांसाठी ३५० कोटी

Mumbai Kabaddi: मुंबई उपनगर कबड्डी स्पर्धेत संघांची जोरदार चुरस! स्पर्श फौंडेशन, स्वस्तिक मंडळासह पाच संघांची चौथ्या फेरीत धडक

Farmers Protest: शेतीची वीज खंडित केल्याने ‘रास्तारोको’ तहसीलदारांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

कर्करोगग्रस्त चिमुकल्यांसाठी विवेक ओबेरॉयचा खास उपक्रम; 'रामायणम्'चं ठेवलं विशेष स्क्रीनिंग

Latest Marathi News Live Update : Jalgaon Bank Election महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकणार; चंद्रकांत सोनवणेंचा विश्वास

SCROLL FOR NEXT