Hyderabad Incident
Hyderabad Incident 
देश

Hyderabad Crime: पार्किंगमध्ये झोपलेल्या कामगार महिलेच्या चिमुकलीला एसयुव्हीनं चिरडलं! हैदराबादेतील हृदयद्रावक घटना

Amit Ujagare (अमित उजागरे)

हैदराबाद : सोसायटीच्या पार्किंगमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. सोसायटीत घरगुती कामानिमित्त येणाऱ्या कामगार महिलेची ही मुलगी होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, चौकशी सुरु करण्यात आली आहे. (woman labourer two year old daughter death at the spot due to rammed by car who was sleep in parking in Hyderabad)

पोलिसांनी सांगितलं की, एक कामगार महिला कामानिमित्त सोसायटीत आली होती. आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला तीनं सोबत आणलं होतं. मुलीला पार्किंग लॉटमध्ये झोपवून ती काम करत होती. त्याचवेळी सोसायटीतल्या व्यक्तीनं बाहेरुन आल्यानंतर कार पार्क केली, पण त्याचवेळी पार्किंगमध्ये झोपलेल्या मुलीच्या अंगावरुन त्यानं थेट कार नेली. यामुळं या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

दरम्यान, ही कार एका एक्साईज सबइन्स्पेक्टरशी संबंधित असून या अधिकारी महिलेच्या पतीकडून कार चालवताना अनावधानानं ही घटना घडली. या प्रकरणी भादंवि अतंर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedarnath: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, यात्रेकरू थोडक्यात बचावले...थरारक व्हिडिओ पाहा

मागच्या वर्षी 1 हजार, पण यंदा 10 हजार टँकर, सरकारचं दुष्काळाकडे लक्ष नाही; शरद पवारांची टीका

Sharmin Segal: "ती माझी भाची आहे म्हणून नाही तर..."; 'हिरामंडी'मध्ये शर्मीनला कास्ट करण्यावर अखेर भन्साळींनी सोडलं मौन

Pune Porsche Accident: 'कारमध्ये 4 जण होते, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला'; पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

Team India Coach: 'दबाव अन् राजकारण...', भारताच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेबद्दल केएल राहुलने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला काय दिला सल्ला?

SCROLL FOR NEXT