Justin Langer | KL Rahul
Justin Langer | KL RahulSakal

Team India Coach: 'दबाव अन् राजकारण...', भारताच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेबद्दल केएल राहुलने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला काय दिला सल्ला?

Justin Langer on India Coach Job: भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नकार देताना दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केएल राहुलने दिलेल्या सल्ल्याबद्दल खुलासा केला आहे.

Justin Langer on India Coach Job: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वी भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी उमेदवारी अर्ज मागवले आहेत.

त्यामुळे सध्या या पदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यामधील एक नाव म्हणजे जस्टीन लँगर. पण लँगर यांनी या पदासाठी अर्ज करणार नसल्याचे सांगताना केएल राहुलने दिलेल्या सल्ल्याचाही उल्लेख केला आहे.

लँगर हे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक आहेत. तसेच ते आयपीएलमध्ये सध्या लखनौ सुपर जायंट्स संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहेत.

दरम्यान, त्यांचा अनुभव पाहाता, त्यांचे नावही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी चर्चेत होतं. मात्र, त्यांनी स्पष्ट केले आहे की सध्यातरी ते हे पद स्विकारू शकत नाही.

Justin Langer | KL Rahul
Team India Coach: 'भारतीय संघाच्या कोचसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला BCCI ने प्रस्ताव...', जय शाह यांचा मोठा खुलासा

बीबीसी स्टंप पॉडकास्टमध्ये बोलताना लँगर यांनी सांगितले की 'ही खूप चांगली नोकरी आहे, पण सध्यातरी माझ्यासाठी नाही. मला हे देखील माहिती आहे प्रशिक्षकाची भूमिका सर्वसमावेशक आहे आणि ऑस्ट्रेलियासाठी मी चार वर्षांसाठी ही भूमिका निभावलेली आहे. प्रमाणिकपणे सांगायचे झाले, तर ही भूमिका थकवणारी आहे.'

लँगर यांनी २०१७ नंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने ऍशेस जिंकण्याबरोबरच टी२० वर्ल्ड कपही जिंकला होता.

याशिवाय लँगर यांना विचारण्यात आले की ते भविष्यात पुन्हा राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होणार का? त्यावर त्यांनी भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून असणाऱ्या दवाबाबद्दल आणि केएल राहुलने दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितले.

Justin Langer | KL Rahul
Team India Head Coach : लक्ष्मण होणार द्रविड यांचे उत्तराधिकारी? गंभीर, लँगर यांचीही नावे चर्चेत

लँगर म्हणाले, "मी नाही म्हणणार नाही. भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्याच्या दबावाबद्दल मी केएल राहुलशी बोलत होतो. तो मला म्हणाला, 'तुम्हाला जर असं वाटत असेल की आयपीएल संघात दबाव आणि राजकारण आहे, तर त्याच्या 1000 पट अधिक भारतीय संघाचे प्रशिक्षक असण्यात आहे.' मला वाटतं हा सल्ला चांगला होता. "

दरम्यान, सध्यातरी लँगर यांनी लखनौचे प्रशिक्षकपद कायम करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. या संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे आहे.

सध्या भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे आहे. पण द्रविडबरोबरचा करार जून 2024 पर्यंत आहे. त्यामुळे त्यांनंतर होणाऱ्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचा करार साडेतीन वर्षांसाठी असेल, असे बीसीसीआयने सांगितले आहे. यासाठी 27 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com