woman who ran away with the lover murdered the daughter first and later killed the son at chandigarh 
देश

'ही' आई नव्हे तर राक्षसीनच...

वृत्तसंस्था

चंदीगड: प्रियकरासाठी दोन चिमुकल्यांचा जीव घेणारी आई नव्हे तर राक्षसीन आहे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहे. प्रियकरासाठी सहा महिने व अडीच वर्षाच्या मुलाचा तिने खून केला असून, तिला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

प्रियकरासोबत ती मजा करत असताना दुसरीकडे तिचेच बाळ शेवटची घटका मोजत होते. अखेर श्वास कोंडल्यामुळे अडीच वर्षाच्या मुलाने जगाचा निरोप घेतला. माता न तूं, वैरिणी... या म्हणीचा प्रत्येय येथे आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्‍टर-45 मध्ये राहात असलेल्या महिलेचे एकासोबत प्रेमसंबंध होते. प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी तिने आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला बेडमध्ये कोंडून ठेवले आणि प्रियकरासोबत पळून गेली होती. पती दशरथ रात्री नऊच्या सुमारास घरी आला. त्यावेळी त्याला पत्नी रुपा आणि मुलगा दिसला नाही. दशरथ यांनी पत्नीला फोन केला. यावेळी तिने आपण पळून आले असून, मुलाला घरामध्ये कोंडून ठेवल्याचे सांगितले. दशरथ यांनी बेड उघडला पण, त्यावेळी मुलाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, दशरथ यांनी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली. ऑक्‍सिजन अभावी मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती अहवालातून पुढे आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला तिला ताब्यात घेतले. यावेळी तिने सहा महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले. मुलीला दुध पाजण्यासाठी मांडीवर घेतले होते. मुलगी दूध पित असताना तिच्या गळ्याला अंगठा लावून खून केला. नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवून अंत्यसंस्कार केले. परंतु, तिने खून केल्याचे सांगितल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. अहवाल हाती आल्यानंतर खून झाल्याचे निष्पन्न झाले. रूपाने नवऱयाचाही खून करण्याचा प्रयत्न केला होता. पण, अनेकदा तो बचावला, असे रूपाने तपासादरम्यान सांगितले.

पोलिसांनी रूपाला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान एक-एक माहिती देऊ लागली. तिची माहिती ऐकून पोलिसही चक्रावून गेले. न्यायालयाने तिला 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT