women beaten in mandi video viral 
देश

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची रात्र सुन्न करणारी...

वृत्तसंस्था

मंडी (हिमाचल प्रदेश): दोघांच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस. वाढदिवसाच्या रात्री नवरा आणि सासूने विवाहितेला बेदम मारहाण केली. रात्रभर फक्त ते मारहाणच करत राहिले. महिलेच्या आईने मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

नेटिझन्सनी व्हिडिओ पाहून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पती आणि सासूला अटक केली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मंडी येथील थलाट येथे राहणाऱ्या खुशबूचे 26 जानेवारी 2019 रोजी पानारसा येथे राहणाऱ्या चिरंजीशी विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्यांनी खुशबूला मानसिक व शारिरीक त्रास देण्यास सुरवात केली. छळ असह्य झाल्यानंतर खुशबू पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेली होती. परंतु, सासरच्यांनी घरगुती कारण पुढे करत प्रकरण दाबले होते. 26 जानेवारी 2020 रोजी लग्नाचा वाढदिवस होता. मात्र, याच दिवशी चिरंजी आणि त्याची आई इंद्रदेवी यांनी खुशबूला रात्रभर बेदम मारहाण केली. ओरडू नये म्हणून तोंड बांधून ठेवले. दुसऱया दिवशी खुशबूने आपल्या आईला याबाबत सांगितले. खुशबूच्या आईने मारहाणीचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला व न्याय मागितला. शिवाय, ऑटो पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असून, काही तासांमध्येच व्हिडिओ 81 हजार शेअर झाला असून, 20 हजार प्रतिक्रिया आहेत. शिवाय, 43 हजार जणांनी लाईक केला आहे.

पोलिस अधीक्षक गरदेव शर्मा म्हणाले, याबाबत तक्रार दाखल झाली असून, पती व सासूला अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने राजीनामा हाती सोपवला; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

Raigad Heavy Rain: रायगड जिल्ह्यात सोमवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Maharashtra Monsoon: मुंबईसह कोकण जलमय! रायगडात पूरसदृश परिस्थिती; महामार्ग, द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! शिवसेना नेत्याच्या कार्यालयावर भलंमोठं झाड कोसळलं; झाडांचा प्रश्न ऐरणीवर

T20 World Cup 2026 Final: एलिस पेरीची विश्वविक्रमाशी बरोबरी, तर ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांचे अफलातून कॅच; पण तरी इंग्लंड दीडशे पार

SCROLL FOR NEXT