Women councilor accuses mayors son winked at her during board meeting at bihar 
देश

Video : महापौराच्या मुलाने नगरसेविकेला मारला डोळा

वृत्तसंस्था

पटना : एका महापौराच्या मुलाने नगरसेविकेला डोळा मारल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. नगरसेविकेने छेडछाडीचा आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

पटना महानगर पालिकेच्या बैठकीदरम्यान डोळा मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नगरसेविका पिंकी देवी यांनी महापौरांकडे तक्रार केली. मात्र, महापौरांनी तुझी चुकी असल्याचे सांगत नगरसेविकेलाच सुनावले. त्यांनतर नगरसेविकेने थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली आहे.  

प्रसारमाध्यमांशी बोलताना पिंकी देवी म्हणाल्या, 'महानगर पालिकेची बैठक सुरू होती. महापौरांचा मुलगा शिशिरकुमार हा नगरसेवक नसतानाही हजर होता. बैठकीदरम्यन शिशिरकुमार हा माझ्याकडे बघून हसला आणि डोळा मारला. मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, तो वारंवार डोळा मारत होता. त्यानंतर तुझ्या पालकांकडे याबाबत तक्रार करेन, असे त्याला सांगितले. पण, तो काही ऐकत नव्हता. यामुळे घडलेल्या प्रकाराची माहिती महापौरांना दिली. पण, महापौरांनी मलाच दोषी ठरवत, तुम्ही लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करता म्हणाले. याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. शिवाय, हा प्रकार थांबला नाही तर आपण महिला आयोग किंवा न्यायालयात जाणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

SCROLL FOR NEXT