Viral Video 
देश

Video: पद्म विजेत्या आदिवासी वृद्धेला डान्स करायला भाग पाडलं; लोकं संतापले

दत्ता लवांडे

कोरापुट (ओडीसा) : ओडीसामधील पद्म पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांच्या डान्सचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना एका महिला समाजसेविकाने त्यांना त्यांचा पारंपारिक डान्स करायला लावले आणि व्हिडिओ बनवला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे पराजा जमातीने आक्षेप घेतला असून या समाजसेविका महिलेचा निषेध केला आहे.

(Padm Awardee Kamla Pujari Dance Viral Video)

पराजा जमातीने आपल्या पारंपारिक पद्धतीच्या डान्सचा अपमान झाल्याचं सांगत त्या महिलेवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. सदर व्हिडिओमध्ये कमला पुजारी यांना बळजबरीने डान्स करायला लावत असल्याचं दिसत आहे. "मला डान्स करायची इच्छा नव्हती पण त्या महिलेने मला डान्स करायला भाग पाडलं. मी वारंवार तिला नकार दिला पण तिने ते न ऐकता मला डान्स करायला लावला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. त्यावेळी मी खूप थकलेली आणि आजारी होते." असं कमला पुजारी यांनी सांगितलं.

दरम्यान, पद्म पुरस्कार मिळालेल्या महिलेला अशा प्रकारे बळजबरी डान्स करायला लावल्याने सदर महिलेचा निषेध केला जात असून कडक कारवाईची मागणी पराजा जमातीने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

Kolhapur Crime News : वंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Pune News: इंदापुरात २९ गायी-वासरांची सुटका; तीन वासरांचा गुदमरून मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा, धक्कादायक चित्र समोर!

SCROLL FOR NEXT