Women in Empowerment
Women in Empowerment 
देश

देशात महिला ‘बॉस’चा दबदबा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. अनेक कंपन्या, संस्थांमध्ये सर्व कारभार महिलांच्या हाती आहे. महिलांची काम करण्याची क्षेत्रे विस्तारली असून वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या महिलांची संख्याही वाढली आहे. लंडन येथील ग्रँट थॉर्नटन या कर व सल्लागार कंपनीच्या ‘इंटरनॅशनल बिझनेस रिपोर्ट २०२२’ या अहवालातही याची दखल घेतली आहे. भारतात कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदापर्यंत पोहचलेल्या महिलांची संख्या तिपटीने वाढली आहे.

प्रमाण १७ वरून ३८ टक्क्यांवर

‘इंटरनॅशनल बिझनेस रिपोर्ट २०२२’ च्या सर्व्हेमध्ये २९ देशांमधील दहा हजार कंपन्या सहभागी झाल्या होत्या. अहवालातील निरीक्षणानुसार २०१७ मध्ये जगभरात २५ टक्के महिला वरिष्ठ पदावर होत्या. २०२२ मध्ये ते प्रमाण ३२ टक्क्यावर पोहोचले आहेत. भारतात२०१७ मध्ये हे प्रमाण १७ टक्के होते. यंदा ते ३८ टक्के झाले आहे. म्हणजेच पाच वर्षांत जगभरात महिला ‘बॉस’च्या तुलनेत हे प्रमाण ३ टक्क्यांनी जास्त आहे.

कोरोनाकाळ लाभदायी

  • ‘ग्रॅंट थार्नटन’कडून भारतातील २५० पेक्षा जास्त कंपन्यांचा सर्वे

  • कोरोनाकाळातील कामाच्या पद्धतीत झालेला बदल महिलांसाठी लाभदायी ठरल्याचे निरीक्षण

  • कंपनीत महिला व पुरुषांचे सरासरी प्रमाण वाढविण्यासाठी भागधारकांकडून दबाव आल्याचे मत ४९ टक्के जणांनी व्यक्त केले.

  • कामाच्या नव्या पद्धतीमुळे भविष्यात महिलांची करिअरमध्ये यशाचे शिखर गाठू शकतील, असा विश्‍वास तब्बल ९० टक्के जणांना वाटत आहे.

कंपन्यांच्या संस्थापक

  • महिला केवळ पदोन्नतीच मिळवीत नसून स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय उभारून रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देतात

  • देशातील ४५ स्टार्टअप महिलांच्या मालकीचे आहेत

  • सुमारे २० टक्के मध्यम आणि लघु उद्योगांच्या कर्ताधर्त्या महिला आहे

  • शिक्षण क्षेत्रात सर्वांत जास्त ३० टक्के महिला अधिकारीपदी

  • बांधकाम व्यवसायात १४ टक्के महिला ‘बॉस’

लेडी बॉस

  • शिक्षण - बॉस 30 - कर्मचाऱ्यांची संख्या 39

  • फिटनेस - बॉस 24 - कर्मचाऱ्यांची संख्या 33

  • माध्यमे - बॉस 23 - कर्मचाऱ्यांची संख्या 31

  • माहिती व तंत्रज्ञान - बॉस 18 - कर्मचाऱ्यांची संख्या 27

  • बांधकाम क्षेत्र - बॉस 14 - कर्मचाऱ्यांची संख्या 21

देशातील स्थिती (आकडे कोटीत)

  • ४३.२ कोटी - नोकरदार महिला

  • १.३५ ते १.५७ -उद्योगांची मालकी असलेल्या महिला

  • २.२ ते २.७ - रोजगार मिळालेल्यांची संख्या

  • ३ - महिलांच्या मालकीच्या व्यवसायांची २०३० मधील अंदाजे संख्या

  • १५ ते १७ - २०३०मधील रोजगार मिळणाऱ्यांची संख्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT