Congress Government Gruhalakshmi Yojana Karnataka esakal
देश

गृहलक्ष्मी योजनेचे 2000 रुपये लाभार्थ्यांना मिळेनात; तीन महिन्यांपासून प्रतीक्षा, मंत्र्यांची नुसतीच आश्वासने!

Government scheme : कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्य शासनाकडून पाच महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या.

सकाळ डिजिटल टीम

गृहलक्ष्मी लाभार्थींच्या खात्यावर दोन महिन्यांपासून रक्कम जमा नाही. त्यामुळे राज्य शासनाकडून एक महिन्यापासून पैसे जमा नाहीत, असा दावा केला जात आहे.

काँग्रेस सरकारच्या (Congress Government) महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ योजनेंतर्गत (Gruhalakshmi Yojana Karnataka) दर महिन्याला मिळणारे दोन हजार रुपये तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी (ता. ५) बेळगाव दौऱ्यावर होते. दौऱ्यात त्यांनी गृहलक्ष्मी योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम केवळ महिन्यापासून थकीत आहे, असे सांगितले; परंतु अनेक लाभार्थींनी तीन महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत, असा दावा केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्य शासनाकडून पाच महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या. त्यात महिलांना मोफत बस प्रवास या योजनेसाठी शक्ती योजना, मोफत वीज योजनेसाठी गृहज्योती, आहार धान्य पुरवठ्यासाठी अन्यभाग्य, बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी व आर्थिक दुर्बल आणि गरीब महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना लागू केली. त्यापैकी शक्ती, गृहलक्ष्मी, गृहज्योती आणि अन्यभाग्य योजना पहिल्या सहा महिन्यांत जाहीर करून त्याची अंमलबजावणी केली; मात्र युवा निधी योजनेला विलंबाने सुरुवात झाली.

गृहलक्ष्मी योजनेबाबत वाढल्या तक्रारी

पंचहमी योजनेपैकी महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थींना दोन हजार रुपये महिलांना दिले जातात. १५ ऑगस्ट २०२३ ला या योजनेला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून जूनअखेरपर्यंत दोन हजार लाभार्थींना मिळायचे; परंतु काही महिन्यांपासून लाभार्थींना नियोजित वेळेत पैसे मिळत नाहीत. त्यामुळे याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. काही लाभार्थींना तीन महिन्यांपासून पैसे आलेले नाहीत, असे ते सांगत आहेत.

वस्तुस्थिती

गृहलक्ष्मी लाभार्थींच्या खात्यावर दोन महिन्यांपासून रक्कम जमा नाही. त्यामुळे राज्य शासनाकडून एक महिन्यापासून पैसे जमा नाहीत, असा दावा केला जात आहे; मात्र प्रत्यक्षात महिला व बालकल्याण खात्याच्या दफ्तरी तशी नोंद नाही. त्यामुळे गृहलक्ष्मीचे लाभार्थी हे दोन महिन्यांपासून अर्थसाह्याच्या प्रतीक्षेत आहेत.

‘गृहलक्ष्मी’ योजनेचे लाभार्थी कोण?

  • -बीपीएल, एपीएल शिधापत्रिकाधारक कुटुंबातील प्रमुख महिलेला गृहलक्ष्मीचा लाभ

  • -दर महिन्याला दोन हजार अर्थसाह्य

  • -अर्जात कुटुंबप्रमुख म्हणून महिलेची नोंद

  • -अर्जासोबत बॅंक खाते, आधारकार्डचा तपशील

गृहलक्ष्मी योजनेंतर्गत केवळ १ महिन्याचे पैसे देणे बाकी आहेत. अधिकाऱ्यांना सूचना करून तातडीने पैसे जमा करण्याबाबत सूचना देऊ.

-सिद्धरामय्या, मुख्यमंत्री (५ ऑगस्ट २०२४).

गृहलक्ष्मी लाभार्थींच्या खात्यावर १५ ऑगस्टनंतर पैसे जमा करण्यात येतील. याबाबत चर्चा होऊन सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला आहे.’’

-लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar), महिला व बाल कल्याणमंत्री.

गृहलक्ष्मी लाभार्थींचे पैसे लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्याबाबत बैठक घेतली आहे. त्या बैठकीनंतर कार्यवाही हाती घेतली असून, येत्या आठवड्यात रक्कम जमा केली जाईल.

-एम. नागराजू, उपसंचालक, महिला व बाल कल्याण.

विधानसभा निवडणुकीत गृहलक्ष्मीचे दोन वेळा आणि अन्नभाग्य योजनेचे एकदा पैसे आले; मात्र निवडणूक झाल्यापासून अद्याप पैसे आलेले नाहीत. याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. बॅंकेत तपशील घेतला; मात्र सरकारकडून पैसे थेट खात्यावर जमा केले जातील, असे सांगण्यात येत आहे.

-आरती सायणुचे, लाभार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT