देश

Womens Reservation Bill : महिला आरक्षणाबाबत बाळासाहेबांची भूमिका 'अशी' होती; संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं

संतोष कानडे

नवी दिल्लीः सोमवारपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरु झालेलं आहे. या अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाचा मद्दा गाजतोय तो महिला आरक्षणाचा. मंगळवारी महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत मांडण्यात आलेलं आहे. आज (बुधवारी) यावर चर्चा होत आहे.

सोनिया गांधी आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाच्या मुख्य स्पीकर आहेत. त्यांनी काँग्रेसच्या वतीने महिला आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. सकाळी या विधेयकावर बोलताना संजय राऊत यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली. बाळासाहेबांचं महिला आरक्षणाबद्दल मत संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महिला आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. महिलांना थेट जागा देण्यापेक्षा राजकीय पक्षांवर बंधनं घालून त्यांना ३३ टक्के महिला निवडून देण्याबाब नियम करावा, असं ते म्हणाले होते, असं राऊतांनी सांगितलं.

आरक्षणाबाबत पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, चांगली गोष्ट आहे की 13-14 वर्षांपासून हे विधेयक वनवासात गेलं होतं, हाणामाऱ्या झाल्या, रणकंद माजलं होतं. फक्त महिलांची संख्या वाढवून त्यांचे प्रश्न.. त्यांच्यावरचे अत्याचार थांबणार आहेत का?

काय म्हणाले राऊत?

कायदे करूनही देशात अनेक निर्भयायांचे बळी जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण आहे, पण तिथं घराणेशाही सगळ्याच पक्षात दिसते. 33 टक्के आरक्षण थेट देण्यापेक्षा आपापल्या पक्षातून आरक्षण द्यावं, हे बाळासाहेब ठाकरे यांचं मत होतं.

ज्या नव्या संसद भवनात मोदी सरकारने विधेयक आणलं त्या भवनाच्या उद्घाटनापासून महिला राष्ट्रपतींना रोखलं होतं. 2029 ला हे सरकार राहील की नाही हे माहीत नाही, तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असेल.. पण असं कोणी कायदा करत असेल तर याचं स्वागत केलं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT