Vijaya-Reddy 
देश

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून महिला तहसीलदाराला कार्यालयातच पेटविले

आर. एच. विद्या

हैदराबाद - तेलंगणमध्ये आज घडलेल्या भयंकर घटनेत एका महिला तहसीलदाराला कार्यालयातच भरदिवसा जिवंत जाळण्यात आले. रंगा रेड्डी जिल्ह्यातील अब्दुलपूरमेट येथे घडलेल्या या घटनेमागे जमिनीचा वाद असल्याचा पोलिसांचा संशय आहे. विजया रेड्डी (वय ३०) यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला, तर त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघे होरपळून जखमी झाले. हल्लेखोरही होरपळून जखमी झाला आहे.

कुरा सुरेश असे हल्लेखोराचे नाव असून, तो गोवेरेल्लीचा रहिवासी आहे. दुपारी दीडच्या सुमारास त्याने तहसील कार्यालयात येऊन विजया रेड्डी यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. सुरेश हा शेतकरी असल्याचे कळते. बाचेरान या गावात त्याची सात एकर जमीन असून, ती त्याच्या भावाबरोबर वादात आहे. या संदर्भात न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यातून ही घटना घडल्याचा संशय राचेकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी व्यक्त केला. या घटनेत सुरेशही भाजला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

विजया रेड्डी यांना जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी धावले. तोपर्यंत तहसील कार्यालयातील एक कर्मचारीही पोलिस ठाण्यात आला होता. तोही भाजलेल्या स्थितीत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने विजया रेड्डी यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवताच रेड्डी यांच्या मोटारीचा चालक आणि एक शिपाई त्यांच्या मदतीला धावले. मात्र, गंभीर स्वरूपात होरपळल्याने विजया रेड्डी जागीच मरण पावल्या. महसूलमंत्री पी. सविता इंद्र रेड्डी यांनी या घटनेचा निषेध केला असून, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, म्हणून उपाय योजण्याचे आश्‍वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT