देश

लॉकडाउनमध्ये तिची होतेय घुसमट; मासिक धर्मावरून स्त्रियांचा कोंडमारा

पीटीआय

नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे चार भिंतींमधील ‘ती’ची घुसमट अधिकच वाढली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात स्त्रियांच्या मासिक धर्माबाबत कमालीची शांतता आणि एक प्रकारची स्तब्धता दिसून येत आहे. याबाबत आवाज उठविण्याची हीच योग्य वेळ असून नकारात्मक सामाजिक प्रथा आणि परंपरा यांच्यात बदल घडवून आणणे हे आजमितीस खूप महत्त्वपूर्ण बनले असल्याचे युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी यास्मिन अली हक यांनी म्हटले आहे. 

मासिक पाळी स्वछता दिनानिमित्त गुरुवारी संवाद साधताना हक म्हणाल्या की, ‘देशातील आर्थिकदृष्टया मागास घटकांतील लाखो महिला आणि मुलींना त्यांच्या मासिक धर्माच्या काळात आजही पुरेशी स्वच्छता ठेवता येत नाही. यामध्ये सुरक्षितता आणि त्यांच्या आत्मसन्मानाचाही मुद्दाही बाजूला पडलेला दिसून येतो. लॉकडाउनमुळे अनेक महिलांचा रोजगार गेला असून काहीजणी लॉकडाउनमुळे अशा दुर्गम ठिकाणी अडकून पडल्या आहेत की तिथे त्यांना मासिक धर्मासाठी पुरेशी साधने मिळताना दिसत नाहीत. आता या विरोधातील अनेक नकारात्मक बाबींविरोधात आवाज उठविणे गरजेचे झाले आहे. आता काही जुनाट प्रथा आणि परंपरा बदलण्याची गरज आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑनलाइन मोहीम 
युनिसेफने यासाठी एक आठवडाभराची मोहीम सुरू केली असून #RedDotChallenge असे नाव तिला देण्यात आले आहे. महिला आणि मुलींना सुरक्षितपणे आणि सन्मानाने त्यांचा मासिक धर्म पार पाडता यावा म्हणून या मोहिमेच्या माध्यमातून ऑनलाइन जनजागृती केली जात आहे. या माध्यमातून स्त्रीचे मासिक आरोग्य, तिच्या स्वच्छतेचा प्रश्न, या काळात मुलींना नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, महिलांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी तसेच कोरोनाच्या काळात यांची तीव्रता कशा पद्धतीने वाढली आहे आदीबाबीविषयी जागृती केली जात आहे. 

यांचा मोहिमेला पाठिंबा 
युनिसेफची युथ अम्बॅसिडर हिमा दास, मानुषी चिल्लर, दिया मिर्झा, अदिती राव हैदरी, डायना पेंटी, निरू बाजवा, सेजल कुमार, मेघना कौर, आशना श्रॉफ 

स्त्रियांचा मासिक धर्म ही शरमेची बाब नाही. याबाबत मुले आणि मुलींमध्ये जाणीवजागृती केली जावी. नकारात्मक रूढी, प्रथा परंपरा यांचा त्याग करावा लागेल. देशभरातील जनऔषधी केंद्रांवर माफक दरात सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
स्मृती इराणी, महिला आणि बालकल्याणमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT