Women's Reservation Bill 
देश

Women's Reservation Bill: "भाजप नेत्याने मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला"; सुप्रिया सुळेंचा संसदेत हल्लाबोल!

Sandip Kapde

Women's Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली.

महिला विधेयकाला माझा पाठिंबा आहे पण मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा व्हावी, तसेत एसी, एसटी, ओबीसी महिलांना आरक्षण विधेयकात सहभागी करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

भाजप नेत्याने मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला. भाजपकडून महिलांचा सतत अपमान होत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

एमके कनिमोळी द्रमुकच्या वतीने बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. यावेळी सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विरोध केला. भाजपचे लोक महिलांचाच अपमान करतात. त्यानंतर भाजपचे लोक शांत झाले, यावरुन देखील सुळेंनी भाजपवर हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "निशिकांत दुबे म्हणाले की इंडीया आघाडी अशा लोकांच्या बाजूने आहे जे महिलांना खाली पळवून लावतात आणि अपमानास्पद बोलतात. मात्र महाराष्ट्रात भाजपचे एक प्रमुख (चंद्रकांत पाटील) होते. त्यांनी मला वैयक्तिकरित्या टेलिव्हिजनवर रेकॉर्डवर सांगितले, सुप्रिया सुळे घरी जा, जेवण बनवा, दुसऱ्या देशात जा. हीच भाजपची मानसिकता आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमित मालवीय यांना हटवलं, भाजपच्या IT सेलची कमान आता केमिस्ट्री प्राध्यापकाच्या हाती, कोण आहेत दीपक म्हस्के?

अधिकाऱ्यांच्या पदांवर सरकारची ‘कात्री’! IAS-IPS अधिकाऱ्यांची संख्या घटणार; कुणी घेतला निर्णय?

Navnath Waghmare Video: ''माझ्या मुलीला ट्रोल का करता? इथून पुढे माझ्याकडून अपशब्द निघणार नाहीत..'' नवनाथ वाघमारेंनी व्यक्त केला खेद

Marathi News Live Updates : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पीडित व्यक्तीकडून १६ लाख रुपये उकळले

Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजावर तांब्याचा सूर्य लावावा की नाही? वास्तुनुसार जाणून घ्या योग्य दिशा, महत्त्व आणि फायदे

SCROLL FOR NEXT