देश

'लष्करात समलिंगी संबंधांना परवानगी नाही'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- लष्करामध्ये समलिंगी संबंधांना कधीही परवानगी मिळणार नसल्याचे वक्तव्य लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले आहे. 

दिल्लीत आयोजित केलेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या समलिंगी संबधावरील निर्णयावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले. लष्करात कधीही असे होत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यासंबधी लष्कराचा वेगळा कायदा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रावत पुढे म्हणाले की, लष्करात सोशल मीडियावर बंदी घालू शकत नाही. यासाठी आम्ही काही सूचनाही जारी केल्या आहेत. कोणीही कसल्याही ट्रॅपमध्ये अडकू नये यासाठी आम्ही इशारा दिलेला आहे. जर एखाद्याने तक्रार दाखल केली नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. अफगाणिस्तान प्रकरणी ते म्हणाले की, जर अफगाणिस्तानमध्ये आपले काही हित नसेल तर तिथे आपण राहणे योग्य नाही. पण अफगाणिस्तानमध्ये आपले हित आहे. त्यामुळे जर कोणी तिसरा व्यक्ती काही बोलू इच्छितो तर आपण त्याला वेगळे करू शकत नाही. चीन आणि पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर आम्ही चांगले काम केले आहे. सौम्य आणि सक्ती असे दुहेरी धोरण आम्ही अवलंबले.

जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणखी सुधारण्याची गरज आहे. त्याठिकाणी शांतीसाठी फक्त आम्हीच माध्यम आहोत. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा आणि दहशतवाद एकत्र येऊ शकत नाही. भारतात प्रवेश करण्यासाठी नियंत्रण रेषेबाहेर जवळपास 300 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT