Ashok Ghehlot  Sakal
देश

Ashok Gehlot : मला माफ करा, मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही

नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ashok Gehlot on Congress President Election : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी आपण कालच्या प्रकाराबद्दल माफी मागितल्याचेही सांगितले. मी मुख्यमंत्री राहिल की नाही हे मला माहीत नाही. याचा निर्णय सोनिया गांधी घेतील असे गेहलोत म्हणाले.

गेहलोत म्हणाले की, मी कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी याला नकार दिला. त्यावेळी ही निवडणूक मी लढेन असे त्यांना सांगितले होते. मात्र, राजस्थानमधील घडामोडी लक्षात घेता मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अशोक गहलोत यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असतानाच अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? असणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे लोकसभा सदस्य शशी थरूर 30 सप्टेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता शशि थरूर आणि दिग्विजय सिंह यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT