Arvind Kejriwal On Punjab esakal
देश

पंजाबच्या हितासाठी एकदिलाने काम करा; अरविंद केजरीवाल

केजरीवाल यांचे आमदारांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : पंजाबच्या हितासाठी प्रामाणिकपणे आणि एकदिलाने काम करण्याचे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या पंजाबमधील नवनिर्वाचित आमदारांना आज केले. कोणत्याही व्यक्तीविद्ध आक्षेपार्ह किंवा उद्धट भाषा न वापरण्याचा सल्लाही त्यांनी या आमदारांना दिला. पंजाबच्या आप आमदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. राज्यात ‘आप’ने सरकार स्थापन केल्यानंतर प्रथमच केजरीवाल यांनी आप आमदारांशी संवाद साधला. (Arvind Kejriwal On Punjab)

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकताच राज्य सरकारच्या विविध खात्यांतील २५ हजार जागा भरण्याची घोषणा केली आहे. तसेच माजी मंत्री व माजी आमदारांची सुरक्षा काढून घेण्याचा त्याचप्रमाणे, भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्याबद्दल केजरीवाल यांनी मुख्यमंत्री मान यांचे कौतुक केले. आमदारांना संबोधित करताना ते म्हणाले, की पंजाबमधील मतदारांनी आपल्यावर मोठा विश्वास टाकला असून आता चांगल्या कामातून तो पात्र ठरविणे ही आपली जबाबदारी आहे. आपण पूर्ण प्रामाणिक राहून समर्पित वृत्तीने काम करायला हवे. निवडणूक प्रचारात आपने मतदारांना प्रामाणिक सरकार देण्याचे आश्वासन दिले होते, याचे स्मरणही त्यांनी यावेळी आमदारांना करून दिले.

आपचे नेते व कार्यकर्त्यांनी नेहमी नम्र राहावे. आप आमदारांनी सांघिक वृत्तीने काम करावे. मुख्यमंत्री भगवंत मान या संघाचे प्रमुख असतील. वैयक्तिक महत्वाकांक्षा सोडली तरच पंजाबची प्रगती होईल.

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: इतका हल्ला करण्याची गरज नाही; आम्हालाही मर्यादा माहीत आहेत; सरन्यायाधीश का संतापले आहेत?

Mumbai Weather: मुंबईकरांना फुटणार घाम! येत्या दोन दिवसात उकाडा अन् वादळी पाऊसही; हवामान विभागाचा इशारा

Latest Marathi News Live Update : हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Pune Police Recruitment : मातीतील कष्ट फळाला आलं! निमगावातील मावशी-भाच्याची थेट पुणे पोलीस दलात भरारी; जिद्दीचा प्रवास वाचून डोळे पाणावतील

तीन 'शिकारी' एकाच भागात; वाघ, बिबट्या आणि चित्त्याच्या दर्शनाचा अतिदुर्मीळ योग

SCROLL FOR NEXT