World Bank approves $1 billion to support India’s fight against COVID-19 
देश

जागतिक बँक भारताच्या मदतीला; केली मोठ्या पॅकेजची घोषणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जागतिक बँक भारताच्या मदतीला धावून आली आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या भारतासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करण्यात आली असून जागतिक बँकेनं देशातील आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी १ अब्ज डॉलरचं पॅकेज जाहीर केलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानं केंद्र सरकारनं प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबर आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. सरकारकडून करण्यात येणाऱ्या या कामाला जागतिक बँकेनं मदतीचा हात दिला आहे. जागतिक बँकेकडून भारताला विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी याची माहिती दिली.

देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केल्यानंतर जागतिक बँकेनं भारताला १ अब्ज डॉलरचं सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर केलं आहे. या माध्यमातून जागतिक बँक देशातील आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यासाठी केल्या जाणाऱ्या कामात सरकारची भागीदार असणार आहे, असं अहमद जुनैद यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतला. पण, लॉकडाउनमुळे थेट अर्थचक्रावरच परिणाम झाला असून, आर्थिक संकटानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सरकारच्या महसूलावर परिणाम झाला असून, राज्यांनही आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT