देश

Kirti Azad: "तुमच्यावेळी तर दाऊद येत होता..."; PM मोदींवर टीका करणाऱ्या किर्ती आझादांवर नेटकरी भडकले

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर मोदींनी खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेतली होती. त्यावरुन आझाद यांनी टीका केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर मोदींनी खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेतली होती. त्यावरुन माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते किर्ती आझाद यांनी ट्विटरवर पोस्ट करत टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर नेटकरी चांगलेच भडकले असून त्यांनी थेट दाऊदची आठवण करुन दिली. (World Cup 2023 Kirti Azad criticizing PM Modi Netizens take a jibe at him rememberig Dawood)

ड्रेसिंग रुममध्ये गेल्याबद्दल आक्षेप

किर्ती आझाद यांनी ट्विट करुन पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले होते. त्यांनी म्हटलं की, ड्रेसिंग रुम कोणत्याही टीमसाठी खास जागा असते. ICC या रुममध्ये केवळ खेळाडू आणि सहाय्यक स्टाफ शिवाय कोणालाही जाण्यास प्रतिबंध असतो. भारताच्या पंतप्रधानांनी टीम इंडियाच्या ट्रेसिंग रुमच्या बाहेर भेटायला हवं होतं. याशिवाय त्यांनी हे देखील लिहिलं की, ८३ चा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांना फायनलसाठी निमंत्रित केलं नाही.

दाऊदची करुन दिली आठवण

आझाद यांच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. तर काहींनी त्यांच्या पोस्टशी सहमती दर्शवली आहे. म्हणजेच वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर मोदींनी खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्यांचं सांत्वन करणं चुकीचं होतं. तर काहींना मोदींची ही कृती योग्य असल्याचं म्हटलं आहे. एकानं तर कमेंटमध्ये लिहिंल की, तुमच्यावेळी तर ड्रेसिंग रुममध्ये दाऊद पण येत होता. या युजरनं थेट दाऊदच ड्रेसिंग रुममध्ये आल्याच्या घटनेची आठवण करुन दिल्यानं. आता सोशल मीडियात हा विषय ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT