Rahul Gandhi and Narendra Modi 
देश

Rahul Gandhi Video : ''आपण जिंकलो असतो पण 'पनौती'मुळे...'', राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

संतोष कानडे

जयपूरः काँग्रेस नेते राहुल गांधी हे मंगळवारी राजस्थानच्या जालोर येथे प्रचारसभेसाठी पोहोचले होते. यावेळी राहुल यांनी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या पराभवावर भाष्य केलं. ते म्हणाले की, आपल्या टीमने विश्वचषक जिंकला असता परंतु पनौतीमुळे आपण हरलो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधींनी पराभवाला मोदींना जबाबदार धरलं आहे. याचदरम्यान सभास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी पनौती..पनौती असं म्हणत ओरडायला सुरुवात केली.

पुढे राहुल गांधी म्हणाले की, आपल्या पोरांनी चांगली मॅच जिंकली असती. परंतु पनौतीने आपल्याला पराभूत केलं... टीव्हीवाले हे सांगणार नाहीत. जनतेला मात्र हे सगळं माहिती आहे. असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा मोदींवर निशाणा साधला.

दरम्यान, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षांनीही विश्वचषकातील भारताच्या पराभवाचे खापर पंतप्रधान मोदींवर फोडले. अजय राय म्हणाले की, मोदींना पाहून भारताचे प्लेअर तणावात होते. मोदींमुळेच आपला पराभव झाला. कारण खेळाडूंवर दबाव होता. तेच पराभवाचे कारण ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT