Khichdi
Khichdi 
देश

भारताची खिचडी पोचली गिनेस बुकात! 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : भारताचे पारंपरिक खाद्य असलेली खिचडी थेट "गिनेस बुक'मध्ये जाऊन बसली आहे! इंडिया गेटवर सुरू असलेल्या "वर्ल्ड फूड इंडिया- 2017' या खाद्यमहोत्सवात आज विख्यात शेफ संजीव कपूर यांच्या नेतृत्वाखाली देशातील 50 उत्तमोत्तम बल्लवाचार्यांनी तब्बल 918 किलो खिचडी तयार करण्याचा विश्‍वविक्रम स्थापित केला. योगगुरू रामदेवबाबा यांनी या खिचडीला फोडणी दिली! 

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, मंत्री निरंजना ज्योती, डेन्मार्कचे अन्नमंत्री एडबेन लार्सन आदी उपस्थित होते. आज तयार झालेली ही खिचडी गुरुद्वारांमध्ये लंगरसाठी येणाऱ्या 60 हजार लोकांना, तसेच "अक्षय पात्र' योजनेचा लाभ घेणाऱ्या गरीब- अनाथ मुलांना देण्यात आली. "गिनेस बुक'च्या प्रकल्प व्यवस्थापक पावलिन सोर्पेस्का यांनी, "खिचडीचा समावेश गिनेस बुकमध्ये झाला आहे, हे सांगण्यास मला आनंद वाटतो,' असे जाहीर केले. खिचडीने गिनेस सन्मान जिंकल्याचे त्यांनी जाहीर करताच उपस्थितांनी अत्यानंदाने नाचण्याचे तेवढे बाकी ठेवल्याचे दृश्‍य पाहायला मिळाले. खरे तर यासाठी 500 किलो खिचडी तयार केली असती, तरी ती निकषांत बसत होती. मात्र, त्यापेक्षाही जास्त खिचडी बनविण्यात आली. रामदेवबाबा यांनी सांगितले, की खिचडी हे हेल्थ फूड आहे. सर्व प्रकारची प्रथिने खिचडीतून मानवी शरीरास मिळतात. या पदार्थाला ब्रॅंड इंडिया म्हणून प्रोत्साहन देणे, ही देशांतर्गत नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आरोग्यदायी सुपरफूड म्हणून खिचडी प्रस्थापित होण्याची सुरवात आहे. 

इंडिया गेटवर तयार झालेली ही खिचडी एक हजार लिटर क्षमतेच्या मोठ्या कढईत शिजवण्यात आली, त्यासाठी संजीव कपूर व त्यांचे सहकारी काल रात्रभर मेहनत घेत होते. यासाठी अन्नप्रक्रिया मंत्रालयातर्फे 500 किलो तांदूळ, 300 किलो डाळ व 100 किलो देशी तूप वापरले गेले. ज्वारी, बाजरी व भाज्यांचाही त्यात समावेश होता. 
खिचडी प्रकरणावर सोशल मीडियात उमटलेल्या प्रतिक्रिया पाहून हरसिमरत कौर बादल यांना, "नैसर्गिकदृष्ट्या पौष्टिक असणारी ही खिचडी आहे. खिचडी हे राष्ट्रीय खाद्य म्हणून जारी करण्याचा विचार नाही. केवळ जागतिक विक्रम करण्यासाठी हा उपक्रम होता,' असा खुलासा करावा लागला. 

खिचडीचा समावेश गिनेस बुकमध्ये झाला आहे, हे सांगण्यास मला आनंद वाटतो. 
- पावलिन सोर्पेस्का, "गिनेस बुक'च्या प्रकल्प व्यवस्थापक 
--- 
500 किलो 
तांदूळ 

300 किलो 
डाळ 

100 किलो 
देशी तूप 

50 
बल्लवाचार्य 

1,000 लिटर 
क्षमतेची कढई 

60 हजार 
लोकांना वाटप 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT