maleria 
देश

भारतात मलेरियाच्या रुग्णांत मोठी घट; 17.6 टक्के रुग्ण झाले कमी

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: WHO World Malaria Report 2020: मागील काही वर्षांत भारतात मलेरियाचे रुग्ण मोठ्या वाढताना दिसत होते. पण आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) जागतिक मलेरिया रिपोर्ट 2020 (World Malaria Report 2020 ) प्रसिध्द केला आहे. यामध्ये भारतात मलेरियाच्या रुग्णांत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये 2018 च्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांत 17.6 टक्क्यांची घट झाली आहे. 

विशेष म्हणजे जगात भारत हा असा एकमेव देश आहे जिथं मलेरियाच्या (Malaria) रुग्णांत सर्वात जास्त घट झाली आहे. क्षेत्राचा विचार केला तर भारतात मलेरियाच्या रुग्णांत सर्वात जास्त घट झाली आहे. 2000 ते 2019 ची आकडेवारी पाहिली तर भारतात 71.8 टक्क्यांनी मलेरिया केसेसची संख्या कमी झाली आहे. तर मृत्यूंच्या संख्येत 73.9 टक्क्यांनी घट झाली आहे.

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ही माहिती समोर आल्याने सरकारच्या मलेरिया विरोधात उचललेल्या पावलांना यश आल्याचं दिसत आहे. मलेरिया हा plasmodium parasite पासून होतो. या डासांच्या चावल्याने मलेरिया होतो. मलेरियाची तीव्रता plasmodiumच्या स्पेसिसवर अवलंबून असते.

मलेरिया झाल्याची लक्षणे कोणती- हा डास चावल्यानंतर काही आठवड्यांतच मलेरियाची लक्षणे दिसण्यास सुरु होतात.
-ताप
-थंडी
-दरदरून घाम येणे

(edited by- pramod sarawale)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Donation Scam: "होय, माझी चूक झाली..." चंपत राय यांचा राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पोर्तुगालकडून खेळणार; ICC नियमांची पुर्तता, आता मैदान गाजवण्यास सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळ निवडणुकीपूर्वी सतेज पाटील यांचा शक्तिप्रदर्शन मेळावा, रणनीतीकडे सर्वांचे लक्ष

FDA Action: तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील उपाहारगृहे, हॉटेलचे परवाने रद्द, १९ जण अटकेत; एफडीएची मोठी कारवाई

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे आणखी कठोर शिक्षेस पात्र : न्यायालय

SCROLL FOR NEXT