World Post Day 2019 
देश

World Post Day 2019: जाणून घ्या जागतिक टपाल दिनाचं महत्त्व

वृत्तसंस्था

मुंबई : जागतिक टपाल दिन किंवा 'वल्ड पोस्ट डे' हा जगभरातून साजरा केला जात आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा. फक्त देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो. जाणून घ्या काय आहे त्याचा इतिहास आणि हा दिवस साजरा करण्याचं महत्त्त्व.

जगात दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑक्टोबरला टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू एवढाच कि, टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना जागरुक करणे होय.

जागतिक टपाल दिनाचा इतिहास
युनिवर्सल पोस्टल युनियन (युपीयु) ची उभारणी करण्यासाठी 1874 मध्ये स्विर्झलंडची राजधानी 'बर्न' येथे 22 देशांनी मिळून करारावर सही केली होती. टोकियोत 1969 मध्ये आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. 1 जुलै 1876 ला भारत 'युनिवर्सल पोस्टल युनियन' चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला.

तंत्रज्ञानासोबत टपाल सेवेत होतोय बदल !
बदलत्या काळासोबत जगातील सर्व टपाल सेवांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक बदल केले आहेत. नवीन तंत्रज्ञानासह टपाल सेवांनी स्वत: ला अधिक जलद केले आहे. डाक, पार्सल, पत्र हे एक्सप्रेसने जाण्याची सेवा सुरु झाली. जवळपास 20 वर्षांपूर्वी या बदलावांना सुरुवात झाली आणि सर्वच स्थरावर तांत्रिक बदल करण्यात आले. आता ऑनलाईन पोस्टल देवाण- घेवाणीवरही लोकांचा विश्वास वाढला आहे. 'युपीयु ने केलेल्या एका सर्वेमध्ये अशी माहिती समोर आली की जगभरातून आजच्या घडीला 55 पेक्षा जास्त प्रकारच्या ई- पोस्टल सेवा उपलब्ध आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ठाकरेंच्या शिलेदारांचा महायुतीशी सामना, मुंबईत दुरंगी सामने अटीतटीचे ठरणार; कोण-कुठे लढणार?

Ruturaj Gaikwad: 'ऋतुराजला संधी तेव्हाच मिळेल, जेव्हा विराट आणि रोहित वनडेत...', R Ashwin नेमकं काय म्हणाला?

Election: निवडणूक की सत्तेचा सौदा? मतदारांचा विश्वास तुटतोय, मतदान टक्केवारी कमी होणार? मनपा निवडणुकांपूर्वीच प्रश्नचिन्ह

Angarki Sankashti Chaturthi 2026: अंगारकी चतुर्थीला करा 'हे' उपाय, भगवान गणेशाच्या आशीर्वादाने संपत्तीत होईल वाढ

Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT