ANI
देश

देशात तंबाखू आणि धुम्रपानामुळे दिवसाला 3500 मृत्यू

सूरज यादव

भारतात तंबाखूचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत 6 टक्के घट झाली आहे. याआधी हे प्रमाण 34.6 टक्के इतकं होतं ते 28.6 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

नवी दिल्ली - दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No tabacco Day) म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जगभरात तंबाखू आणि धुम्रपानाविरोधात लोकांमध्ये जनजागृती केली जाते. तंबांखू, गुटखा, सिगारेट यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. तंबाखू किंवा सिगारेटच्या पाकिटावर तसा इशाराही कंपन्यांकडून देण्यात येतो. आता तंबाखू आणि धुम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी जवळपास 13 लाख जणांचा मृत्यू हा तंबाखू आणि धुम्रपानाने होतो. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे.

गेल्या वर्षीच्या संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, भारतात तंबाखूचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत 6 टक्के घट झाली आहे. याआधी हे प्रमाण 34.6 टक्के इतकं होतं ते 28.6 टक्क्यांवर पोहोचलं आहे. कोरोनामुळे होणाऱे धोकादायक दुष्परिणाम ज्यामध्ये मृत्यूचाही समावेश आहे याला तंबाखू आणि धुम्रपान करणारे लोक लवकर बळी पडतात. अशा लोकांमध्ये 40 ते 50 टक्के धोका जास्त असतो. तंबाखू आणि धुम्रपानामुळे फुफ्फुसला संसर्ग, हृदय विकार आणि कर्करोगाचा धोका असतो. इतकंच नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम होऊ शकतो असं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.

देशात तोंडाचा कर्करोग हा धोकादायक अशा कर्करोगांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे प्रत्येक तासाला जवळपास पाच रुग्णांचा मृत्यू होतो. तंबाखूमध्ये निकोटीन हा घटक असतो. त्यातूनच तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. कर्करोगाची सुरुवात ही लहान लक्षणापासून होते. त्याचं निदान वेळीच झालं तर त्यावर उपारानंतर रुग्ण बरे होऊ शकतात. यावरचे उपचार दीर्घकालीन आणि खर्चिक असतात. तसंच उपचारादरम्यान रुग्णाला अनेक प्रकारच्या थेरपींचा सामना करावा लागतो. या सगळ्यातून वाचायचं असेल तर तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी वेळीच सावध व्हायला हवं असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Tata आणि Reliance ला फटका; ICICI Bank मात्र तेजीत

Bombay High Court: ईडीच्या कारवाईला धक्का; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावरील जप्ती आदेश न्यायालयाकडून रद्द..

Latest Marathi News Live Update : पुण्यात विद्यार्थ्यांसाठी स्काऊट-गाईड उन्हाळी शिबिर; ५५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

Pune Crime: उरुळीकांचनमध्ये गंभीर घटना; अल्पवयीन मुलावर जबरदस्तीचा प्रयत्न, POCSO कायद्यान्वये कारवाई!

SCROLL FOR NEXT