The worlds largest covid hospital will be set up in the delhi 
देश

जगातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय 'या' राज्यात सुरु होणार; वाचा किती असेल क्षमता

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे कोविड-19 रुग्णालय नवी दिल्लीमध्ये लवकरच सुरु होणार आहे. छत्तरपुरमधील राधास्वामी व्यास येथे हे रुग्णालय उभारले जात आहे. या रुग्णालयात तब्बल 10 हजार बेड असणार आहेत. भारत-तिबेट सीमा पोलिसांचे गट कोविड केअर सेंटरसाठी नोडल एजेंसीच्या रुपात काम करत आहे. आईटीबीपीच्या अनुभवी डॉक्टर आणि प्रशासकाच्या गटाने बुधवारी सकाळी येथे येऊन युद्ध स्तरावर तयारी सुरु केली आहे. 

कोरोनाबाधितांना 100 टक्के बरे करणारे औषध आमच्याकडे; तामिळनाडू सरकारचा दावा
आईटीबीपीच्या गटाने दिल्ली सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठक घेतली आहे. दिल्ली पाणी बोर्ड, विद्युत विभागाचे अधिकारी आणि दक्षिण दिल्ली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली होती. 26 जूनपर्यंत जवळपास 2000 बेड क्षमतेचे केंद्र सुरु करण्यात येणार आहे. शिवाय कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनुसार या सेंटरची क्षमता हळूहळू वाढवली जाणार आहे. या सेंटरची कमाल क्षमता 10,200 बेडपर्यंत केली जाऊ शकते. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे केअर सेंटर असून जवळपास 1 हजार डॉक्टर यात सामील होण्याची शक्यता आहे.

कोरोनाची लागण झाल्याने आमदाराचा मृत्यू
भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या (आईटीबीपी) गटांने कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक विलगीकरण आणि कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेल्या केंद्रासाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे छत्तरपुरमधील राधास्वामी व्यास येथील कोविड केअर सेंटरची जबाबदारी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने आईटीबीपीला या कार्यासाठी विशेष नेमले आहे. आईटीबीपीला दिल्ली प्रशासन आणि केंद्रीय अर्धसैनिक दलाच्या पॅरामेडिकल स्टाफची मदत मिळणार आहे. 

रुग्णसंख्या वाढीमागे चाचण्यांचे कारण नाही; जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण 
छत्तरपुरमधील राधास्वामी व्यास येथील रुग्णालय मोठ्या भूभागावर पसरले आहे. या रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी तसेच अन्य प्रकारच्या मूलभूत आवश्यकतेच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. यासाठी मॅरेथॉन बैठका घेण्यात येत आहे. पूर्ण क्षमतेने हे रुग्णालय लवकरात लवकर कार्यरत व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, देशासह दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 62 हजारांचा आकडा ओलांडला आहे. शिवाय दिल्लीत कोरोना विषाणूमुळे 2,223 लोकांचा बळी गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दिल्ली आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT