Brijbhushan Singh
Brijbhushan Singh Esakal
देश

Wrestler Protest: अखेर बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल! 'पॉक्सो'सह दोन FIR

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : ऑलिम्पिकपटू महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांसह महिला खेळाडूंना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल दुसरा विनयभंगाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. पीटीआयनं पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं याबाबत वृत्त दिलं आहे.

दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रणव दयाल यांच्या माहितीनुसार, महिला कुस्तीपटुंच्या तक्रारीवरुन भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कॉनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बृजभूषण सिंह यांच्यावरील पहिली एफआयआर अल्पवयीन पीडित महिला खेळाडूनं केलेल्या आरोपांशी संबंधित आहे. ज्यासाठी त्यांच्यावर POCSO कायद्यांतर्गत विनयभंगा संबंधित IPCचं कलम लावण्यात आलं आहे. इतर, प्रौढ महिला खेळाडूंनी केलेल्या तक्रारींची सर्वसमावेशक चौकशी करण्यासाठी दुसरी एफआयआर विनयभंगाशी संबंधित कलमांतर्गत नोंदवली आहे, असंही पोलीस उपायुक्त प्रणव दयाल यांनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT