Wrestlers Protest Updates 
देश

Wrestlers Protest : कुस्तीपटू आंदोलन प्रकरणी कारवाईला वेग! ब्रिजभूषण सिंग यांच्या घरी धडकले दिल्ली पोलिस

रोहित कणसे

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्ली पोलिसाच्या कारवाईला सुरूवात केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे एक पथक सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंग यांच्या लखनऊ आणि गोंडा येथील घरी पोहचले. यावेळी एसआयटीने ब्रिजभूषण यांच्या घरात उपस्थित १२ लोकांचे जवाब देखील नोंदवले आहेत.

दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या सोबत तसेत घरी काम करणाऱ्या लोकांचे नाव-पत्ते आणि ओळखपत्र साक्षीदार म्हणून गोळा केले आहेत. या चौकशीनंतर पोलिसांचे पथक दिल्लीला परत आले.

विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पूनिया यांच्या नेतृत्वात सर्वा कुस्तीपटूंचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. कुस्तीपटूंनूी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात ७ महिला कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी कनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये ब्रिजभूषण यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे २८ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळाचे दोन गुन्हे नोंदवले.

पहिला गुन्हा एका अल्पवयिन कुस्तिपटूने केलेल्या आरोपांनुसार असून यामध्ये पॉक्सो अॅक्ट नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांसंबधित आहे. या प्रकरणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत १३७ लोकांची साक्षी घेतली आहे.

कुस्तीपटू नोकरीवर परतले

शनिवारी कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, या बैठकीनंतर सोमवारी बजरंग पूनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट हे रल्वेतील त्यांच्या कामावर परत गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar: दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर कुठे गायब? घरात आले जेवणाचे दोन डबे; नेमका प्रकार काय?

Education News : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: आता ५२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना द्यावी लागणार ‘टीईटी’ परीक्षा

Ghati Hospital: एमडी एमएस’च्या ८५ जागा वाढणार; ‘घाटी’त रुग्णसेवेला मिळेल बळकटी, तज्ज्ञ होण्याची संधी

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

SCROLL FOR NEXT